भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि त्यांची पत्नी एडविना यांच्या कोट्यावधी रूपयांच्या खजिनाचा लिलाव होणार आहे. या खजिन्यात जयपूरचा दागिण्यांनी सजलेला हत्ती, सोन्याचं घड्याळ, हिऱ्यांपासून तयार ब्रोच आणि १९५० मध्ये तयार केलेला महाराणी व्हिक्टोरियाचा खेळण्यातील रोबोट यांचा समावेश आहे. लॉर्ड माउंटबॅटन यांना भारत आणि बर्मावरून मिळालेल्या वस्तू आहेत. येथून त्यांना मिळालेल्या ४०० बहुमूल्य वस्तू, दागिने आणि पेंटींग्सचा लिलाव होणार आहे. ज्यांची एकूण किंमत १५ कोटींच्या जवळपास सांगितली जात आहे. 

एडविनाची सोन्याची हॅंडबॅग

लॉर्ड माउंटबॅटन यांच्या या खजिन्याचा लिलाव यावर्षी मार्चमध्ये लंडनमध्ये केला जाणार आहे. हे सर्वच दागिने पॅट्रिसिया माउंटबॅटन यांच्या ताब्यात आहेत. ती माउंटबॅटन यांची मोठी मुलगी आहे. पॅट्रिसिया माउंटबॅटन ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया यांची पणती लागते.

Sotheby कंपनी या वस्तूंचा लिलाव करणार आहे. १९७९ मध्ये एका बॉम्ब स्फोटात लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांची मुलगी पॅट्रिसिया आणि त्यांचा भाऊ निकोलस वाचले होते. पॅट्रिसियाचंही वयाच्या ९३ व्या वर्षी २०१७ मध्ये निधन झालं. या फोटोत डुकराच्या आकाराची पर्स आहे जी सोन्याची आहे. याची किंमत साधरण तीन हजार पाउंड सांगितलं जात आहे.

जयपूरचे सोन्याचे हत्ती

या सर्व वस्तू पॅट्रिसियाच्या १८व्या शतकातील घरी म्हणजे न्यूहाउसमध्ये आणल्या जात आहे. ती इथेच त्यांच्या पतीसोबत राहत होती. या फोटोत तुम्हाला दोन हत्ती दिसत आहेत जे भारतातील जयपूर शहरातून आणण्यात आले आहेत. हे हत्ती सोन्याने रंगवण्यात आले आहे. त्यावर कलाकृती आहे. यांची किंमत दोन ते तीन हजार पाउंड मिळेल असा अंदाज आहे. ही वस्तू माउंटबॅंटन यांना २४व्या मॅरेज अॅनिव्हर्सरीलला गिफ्ट देण्यात आली होती. दोघांचं लग्न दिल्लीत १९२२ मध्ये झालं होतं.

महाराणी व्हिक्टोरीयाचं भारतीय ब्रेसलेट, रोबोटचा होणार लिलाव

या लिलावात ब्रिटनची तत्कालीन महाराणी व्हिक्टोरीया यांचा भारतात तयार करण्यात आलेला डायमंड सेट आणि सोन्याचं ब्रेसलेट यांचाही समावेश आहे. या ब्रेसलेटवर राणी व्हिक्टोरीयाचे पती अल्बर्ट यांचा बालपणीचा फोटो आहे. हे ब्रेसलेट नंतर राणी माउंटबॅटन यांना दिलं होतं. अल्बर्ट यांचं १८६१ मध्ये निधन झालं होतं. हे ब्रेसलेट ४ ते ६ हजार पाउंडला विकलं जाईल अशी अपेक्षा आहे. सोबतच राणीचा एक रोबोटही विकला जाणार आहे.

पॅट्रिसियाचं भारताशी कनेक्शन केवळ वडील माउंटबॅटन यांच्यामुळेच होतं असं नाही तर तिचे पती जॉन यांचंही भारताशी नातं होतं. जॉनचे वडील मायकल क्नाटचबुल १९३८ मध्ये भारताचे दुसरे सर्वात तरूण व्हॉइसरॉय बनले होते. जॉनने भारतात माउंटबॅटन यांच्या हाताखाली काम केलं होतं. 

पॅट्रिसियाच्या या खजिन्यातील एक अनमोल रत्न म्हणजे ब्रिटीशकालीन इंपेरिअल ऑर्डर ऑफ द क्राउन ऑफ इंडिया आहे. याची किंमत १५ ते २० हजार पाउंड आहे. हे इंपेरिअल पॅट्रिसियाला तिच्या सासूने दिलं होतं. यात हिरा आणि मोती आहे. 

तसेच यात पॅट्रिसियाला तिचा पती जॉनने दिलेल्या इंकपॉटचाही समावेश आहे. १८९६ ते १९०३ दरम्यान तयार केलेली सोन्याची घड्याळही विकली जात आहे. याला १५ ते २५ हजार पाउंड किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. या लिलावात भारतात तयार केलेले अनेक फर्निचरही विकले जाणार आहेत.
 

Web Title: Lord Mountbatten Edwina India Burma treasure trove to be auctioned in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.