Lockdown: Girl marry with boyfriend after denied to groom in jhansi pnm | Lockdown: वरात घेऊन नवरदेव आला दारी; पण नवरीच्या ‘त्या’ हट्टापायी पुन्हा परतला माघारी, मग...

Lockdown: वरात घेऊन नवरदेव आला दारी; पण नवरीच्या ‘त्या’ हट्टापायी पुन्हा परतला माघारी, मग...

झांशी – उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यात लॉकडाऊन काळात घडलेल्या अनोख्या लग्नाची गोष्टीची संपूर्ण गावात चर्चा झाली आहे. याठिकाणी एक नवरदेव वरात घेऊन नवरीच्या दारात पोहचला, वरात पाहून नवरीनं पोलिसांना फोन करुन बोलावलं. प्रियकरासोबत लग्न करायचं आहे असं सांगत नवरीने लग्नाला नकार दिला. नवरीची ही मागणी पाहून नवरदेव हैराण झाला.

अचानक नवरीच्या या वागण्यामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नवरीच्या हट्टापायी पोलिसांनाही काहीच करता आलं नाही, त्यानंतर नवरदेव वरात घेऊन माघारी परतला आणि नवरीने तिच्या प्रियकरासोबत गावातील मंदिरात लग्न केले. या दोघांना कुटुंबासह गावकऱ्यांना आशीर्वाद दिले. धवाकर गावातील मुलीसोबत मडवा गावातील मुलाचं लग्न ३० मे रोजी ठरलं होतं.

लॉकडाऊन काळात नवरदेव वरात घेऊन नवरीच्या दारात पोहचला, नवरीने दरवाजा उघडताच वरात पाहून तिने पोलिसांना बोलावलं. यानंतर लहचूरा ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने तिचा हट्ट सोडला नाही, तिने लग्नाला नकार दिला. मुलगी अल्पवयीन नसल्याने कोणीही तिला प्रियकरासोबत लग्न करण्यापासून रोखू शकलं नाही.

नवरीच्या या हट्टामुळे हैराण झालेले नवरदेव आणि वरातीमंडळी पुन्हा माघारी परतले, घरच्यांनीही मुलीचं म्हणणं ऐकून घेतले आणि तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्यास तयार झाले. रविवारी मलौनी गावातील मंदिरात हिंदू धर्मानुसार विधिवत लग्न लावण्यात आले. नवरी आणि तिचा प्रियकर यांच्यासमोर नातेवाईकांना झुकावं लागलं. दोन्ही कुटुंब आणि गावकऱ्यांना या दोघा नवदाम्प्त्यांना आशीर्वाद दिले. पण या अनोख्या लग्नाची चर्चा संपूर्ण गावात पसरली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज; ट्रम्प यांची काय आहे ‘जी ७’ रणनीती?

निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील

१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं

जगप्रसिद्ध व्हिडीओ साइट Youtube ने त्यांचा लोगो काळा केला, जाणून घ्या काय आहे कारण?

७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!

Web Title: Lockdown: Girl marry with boyfriend after denied to groom in jhansi pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.