या वकील मुलाला हवी आहे अशी 'बायको', डिमांड वाचून तुम्हीही व्हाल हैराण; जाहिरात व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 11:22 PM2020-10-06T23:22:24+5:302020-10-06T23:26:10+5:30

लोक अशा प्रकारच्या जाहिरातील मुलगी कशी हवी, हे लिहिताना गोरी, घरातल्यांनाशी जुळवून घेणारी आणि सुंदर असावी, असे लिहितात. मात्र, आज आम्ही आपल्याला एक अशी जाहिरात दाखवणार आहोत, जी सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. (lawyer wants bride who not addicted social media)

lawyer wants a bride who is not addicted to social media ias officer nitin sangwan gives epic reaction | या वकील मुलाला हवी आहे अशी 'बायको', डिमांड वाचून तुम्हीही व्हाल हैराण; जाहिरात व्हायरल

या वकील मुलाला हवी आहे अशी 'बायको', डिमांड वाचून तुम्हीही व्हाल हैराण; जाहिरात व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देया मॅट्रिमोनियल जाहिरातीच्या माध्यमाने एक व्यक्ती, सोश मिडियाचे व्यसन नसणारी मुलगी शोधत आहे.ही जाहिरात पश्चिम बंगालमधील एका 37 वर्षीय वकिलाने छापली आहे.या जाहिरातीचा फोटो आयएएस अधिकरी नितिन सांगवान यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली - आपण अनेक वेळा वर्तमानपत्र अथवा इतरत्र लंग्नासंदर्भातील जाहिराती पाहिल्या असतील. त्या वाचल्याही असतील. तेव्हा आपल्याला दिसून आले असेल, की लोक अशा प्रकारच्या जाहिरातील मुलगी कशी हवी, हे लिहिताना गोरी, घरातल्यांनाशी जुळवून घेणारी आणि सुंदर असावी, असे लिहितात. मात्र, आज आम्ही आपल्याला एक अशी जाहिरात दाखवणार आहोत, जी सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. 

या मॅट्रिमोनियल जाहिरातीच्या माध्यमाने एक व्यक्ती, सोश मिडियाचे व्यसन नसणारी मुलगी शोधत आहे. या जाहिरातीने अनेकांचे लक्ष आकर्षित केले आहे. ही जाहिरात पश्चिम बंगालमधील एका 37 वर्षीय वकिलाने छापली आहे. या जाहिरातीचा फोटो आयएएस अधिकरी नितिन सांगवान यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. याच वेळी त्यांनी “भावी नवरदेव/नवरी, कृपया लक्ष द्या. मॅचिंग होण्याचा क्रायटेरिया बदलत आहेत," असे लिहिले आहे.

या जाहिरातीत नवरदेव मुलाने लिहिले आहे, "चटर्जी 37/5'7" योग व्यवसाय, सुंदर, गोरा, निर्व्यसनी, उच्च न्यायालयात वकील आणि रिसर्चर. कुटुंबात आई-वडील आणि कार आहे. कामरपुकूर या गावी घरही आहे. कसल्याही प्रकारच्या मागणीशिवाय नवरदेव मुलगा, सुंदर, उंच आणि सडपातळ मुलगी शोधत आहे. मुलीला सोशल मीडियाचे व्यसन नसावे.” ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोक ना-ना प्रकारच्या कॉमेंट करत आहेत.

एका युझरने लिहिले आहे, "बिचारा बिना लग्नाचाच मरणार. अशी मुलगी भेटणे सध्या तरी थोडे कठीनच आहे.

Web Title: lawyer wants a bride who is not addicted to social media ias officer nitin sangwan gives epic reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.