Knowledge News: एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:50 PM2022-05-20T15:50:06+5:302022-05-20T15:50:12+5:30

Knowledge News: तुम्ही दिवसभरात किती शब्द बोलता, याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या कामाची माहिती.

Knowledge News: How many words do you speak in a day or in a whole life, find out the amazing information | Knowledge News: एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती...

Knowledge News: एका दिवसात किंवा संपूर्ण आयुष्यात तुम्ही किती शब्द बोलता, जाणून घ्या चकीत करणारी माहिती...

googlenewsNext

Knowledge News: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, दिवसभर आपण बरेच शब्द बोलतो. काहीजणांना बोलण्याचा इतका छंद असतो की, त्यांना शांत बस, असं सागावं लागतं. दुसरीकडे, काहीजण इतकं कमी बोलतात, की त्यांना बोलायला सांगावं लागतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपण दिवसभरात किती शब्द बोलत असतो. जाणून घेऊ याचे उत्तर.

दिवसभरात तुम्ही किती शब्द किंवा वाक्य बोलता, याचा कधी विचार केलाय का? क्वचितच कुणी याबाबत विचार केला असावा. आपल्यापैकी अनेकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. पण, आज आम्ही तुम्हाला याबाबत रंजक माहिती देणार आहोत. लिंक्डइन लर्निंग इंस्ट्रक्टर (LinkedIn Learning Instructor) Jeff Ansell Research नुसार, एक व्यक्ती एका दिवसात कमीत-कमी 7000 शब्द बोलतो. काहीजण यापेक्षा जास्तही बोलतात.

पूर्ण आयुष्यात किती बोलतात?
एका दिवसात आपण किती शब्द बोलतो, याची माहिती तुम्हाला मिळाली. पण, आयुष्यभरात किती शब्द बोलतोत, याचा कधी विचार केलाय का? तुम्ही चकीत व्हाल, पण एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणतः 860,341,500(86 कोटी) शब्द बोलतो. ब्रिटिश रायटर आणि ब्रॉडकास्टर Gyles Brandreth चे पुस्तक The Joy of Lex: How to Have Fun with 860,341,500 Words मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

डिक्शनरीसोबत तुलना
या शब्दांची तुलना करायची झाली, तर एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात Oxford English Dictionary च्या 20 आवृत्या 14.5 वेळेला वाचतो. बायबलशी तुलना केल्यास, King James Bible मध्ये जितके शब्द आहेत, त्याच्या 1110 पट जास्त शब्द एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात बोलतो.

Web Title: Knowledge News: How many words do you speak in a day or in a whole life, find out the amazing information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.