जगातल्या 'या' मुस्लीम देशातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो का छापतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:47 PM2021-09-08T13:47:35+5:302021-09-08T13:49:57+5:30

जगातल्या मुस्लिम लोकसंख्या सर्वात जास्त असलेल्या देशातील नोटांवर गणेशाचा फोटो छापला जातो. चला जाणून घेऊ काय आहे याचं कारण..

Know why Lord Ganesha photo is on Indonesia currency note rupiah | जगातल्या 'या' मुस्लीम देशातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो का छापतात? जाणून घ्या कारण...

जगातल्या 'या' मुस्लीम देशातील नोटांवर भगवान गणेशाचा फोटो का छापतात? जाणून घ्या कारण...

Next

देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. लोक आपल्या लाडक्या बाप्पाची दहा दिवस पूजा करणार आहेत. महाराष्ट्रात तर लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही गणेश उत्सवाचा जल्लोष दिसत आहे. लोक लाडक्या गणेशाबाबत वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. अशात एक आश्चर्याची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जगातल्या मुस्लिम लोकसंख्या सर्वात जास्त असलेल्या देशातील नोटांवर गणेशाचा फोटो छापला जातो. चला जाणून घेऊ काय आहे याचं कारण..

सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर गणेशाचा फोटो

इंडोनेशियाची करन्सीला रूपियाह म्हटलं जातं. इथे २० हजार रूपयांच्या नोटेवर भगवान गणेशाचा फोटो आहे. भगवान गणेशाला या मुस्लिम देशात शिक्षा, कला आणि विज्ञानाची देवता मानलं जातं. खास बाब ही आहे की, इंडोनेशियात साधारण ८७.५ टक्के लोकसंख्या इस्लाम धर्म मानतात आणि केवळ तीन टक्के लोक हिंदू आहेत.

इंडोनेशियातील २० हजार रूपयांच्या नोटेच्या समोरच्या भागावर भगवान गणेशाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरूमचा फोटो छापला आहे. ज्यात विद्यार्थी आणि शिक्षक आहे.

नोटेवर गणेशाचा फोटो असण्याचं कारण

काही वर्षाआधी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था फार जास्त ढासळली होती. त्यानंतर इथे २० हजार रूपयांनी नवीन नोट जारी करण्यात आली होती. ज्यावर भगवान गणेशाचा फोटो छापण्यात आला होता. हा फोटो छापण्यामागचं कारण आर्थिक चिंता मानलं जातं. याने अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल आणि असंच काहीसं बघायला मिळालं होतं.
 

Web Title: Know why Lord Ganesha photo is on Indonesia currency note rupiah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.