अरे देवा! सुंदर दिसण्यासाठी रक्ताने आंघोळ करत होती ही राणी, शेकडो तरूणींचा घेतला होता जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:13 PM2021-05-18T17:13:13+5:302021-05-18T17:34:04+5:30

या राणीचे कारनामे वाचून अंगावर शहारे येऊ शकतात. ही राणी अविवाहित तरूणींना मारून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती.

Know about horrible female serial killer Elizabeth Bathory has bathing of the blood of virgin girls | अरे देवा! सुंदर दिसण्यासाठी रक्ताने आंघोळ करत होती ही राणी, शेकडो तरूणींचा घेतला होता जीव

अरे देवा! सुंदर दिसण्यासाठी रक्ताने आंघोळ करत होती ही राणी, शेकडो तरूणींचा घेतला होता जीव

Next

इतिहासात डोकावलं तर अशा कितीतरी घटना आणि रहस्ये दडून आहेत ज्याबाबत वाचून थक्क व्हायला होतं. आज आम्ही तुम्हाला एका विचित्र राणीची गोष्ट सांगणार आहोत. या राणीच्या अमानवीय कारनाम्यांमुळे लोक तिला घाबरून होते. ही राणी एक सीरीअल किलरही होती. तसं तर तुम्ही अनेक सीरीअर किलरबाबत ऐकलं असेल. पण या राणीचे कारनामे वाचून अंगावर शहारे येऊ शकतात. ही राणी अविवाहित तरूणींना मारून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती.

हंगरीच्या या राणीचं नाव होतं एलिजाबेथ बाथरी. एएलिजाबेथ बाथरीला इतिहासातील सर्वात खतरनाक आणि निर्दयी सीरिअल किलर म्हणून ओळखलं जात होतं. १५८५ ते १६१० दरम्यान बाथरीने ६०० पेक्षा जास्त तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती.

असे म्हटले जाते की, एलिजाबेथला तिचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी अविवाहित तरूणींच्या रक्ताने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला होता. एलिजाबेथला हा प्रकार इतका आवडला की, तिने क्ररतेची सीमा पार केली. सीरिअल किलर एलिजाबेथ तरूणींना मारल्यानंतर त्यांच्यासोबत अमानवीय कृत्य करत होती. काही कथांनुसार, ती मृत तरूणींचं मांस आपल्या दातांनी तोडत होती. सांगितलं असंही जातं की, एलिजाबेथ बाथरीच्या या कृत्यात तिचे तीन नोकरही तिला साथ देत होते.

एलिजाबेथ ही हंगरीच्या राजघराण्यातील होती. एलिजाबेथचं लग्न फेरेंक नॅडेस्की नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं होतं. तो युद्धात तुर्कांविरोधात लढला होता. त्यामुळे तो नॅशनल हिरो होता. तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एलिजाबेथ खूप काही करायची. ती आजूबाजूच्या गावातील मुलींना महालात चांगले पैसे देऊन काम करण्यासाठी बोलवत होती. आणि त्यांना आपली शिकार बनवत होती.

असे सांगितले जाते की, जेव्हा परिसरात मुलींची संख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत परिवारातील मुलींना आपलं शिकार बनवण्यास सुरूवात केली होती. हंगरीच्या राजांना जेव्हा याबाबत समजलं की, तेव्हा त्यांनी याची चौकशी केली. जेव्हा अधिकारी एलिजाबेथच्या महालात पोहोचले तेव्हा तेथील चित्र बघून ते हैराण झाले. अधिकाऱ्यांना महालात अनेक मुलींचे सांगाडे आणि  सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले होते.

१६१० मध्ये एलिजाबेथला तिच्या या अमानवीय कृत्यासाठी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला या गुन्ह्यासाठी फाशी तर दिली गेली नाही. पण तिला तिच्याच महालात कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचं निधन झालं.
 

Web Title: Know about horrible female serial killer Elizabeth Bathory has bathing of the blood of virgin girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.