बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:51 PM2021-07-20T16:51:12+5:302021-07-20T16:52:38+5:30

जिलेबी खाऊशी वाटणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला बायकोचा भन्नाट रिप्लाय

Ips Officer Wants To Have Jalebi But Wife Warns Him | बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय

बायको जिलेबी खाऊ देत नाही; IPS अधिकाऱ्यानं मांडली व्यथा; पत्नीकडून मिळाला गरमागरम रिप्लाय

Next

नवी दिल्ली: गरमागरम तेलातून काढण्यात आलेली जिलेबी अनेकांना आवडते. साखरेच्या पाकात घोळवलेली जिलेबी अनेकांचा वीक पॉईंट असतो. मोठमोठे अधिकारीदेखील याला अपवाद नाहीत. आयपीएस अधिकारी डॉ. संदीप मित्तल त्यांच्यापैकीच एक. पत्नी जिलेबी खाऊ देत नसल्याची व्यथा मित्तल यांनी ट्विटरवर मांडली. त्यावर त्यांची पत्नी डॉ. रिचा शर्मा यांनी धमकीवजा रिप्लाय दिला. 'आज तुम्ही घरी या', असा रिप्लाय डॉ. रिचा शर्मा यांनी दिला. पती पत्नीमधील हा संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आयपीएस अधिकारी डॉ. संदीप मित्तल यांनी १७ जुलैला एक ट्विट केलं. 'लहानपणी एक जिलेबी २५ पैशांना मिळायची. तेव्हा विचार केला होता, मोठा होऊन कमावू लागल्यावर दररोज तीन-चार जिलेब्या खाऊ. आता कमावायला लागलो तर बायको जिलेबी खाऊ देत नाही,' अशी व्यथा मित्तल यांनी मांडली. त्यानंतर काहींनी त्यावर रिप्लाय देताना जिलेबीचे फोटो शेअर केले. तर काहींनी 'कुटुंबाचा विचार करून वहिनी मनाई करत असतील', अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या.

आयपीएस अधिकारी बायको जिलेबी खाऊ देत नाही, अशी व्यथा सर्वांसमोर मांडताना अचानक त्या ट्विटला रिप्लाय दिला. 'आज तुम्ही घरी या' असा धमकीवजा रिप्लाय डॉ. रिचा मित्तल यांनी दिला. आता डॉ. संदीप मित्तल यांना घरी जिलेब्या खायला मिळाल्या की ओरडा याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र संदीप मित्तल यांनी पत्नीचं ट्विट रिट्विट केलं. रिचा मित्तल यांचा रिप्लाय पाहून नेटकरी सुस्साट सुटले. हे  सगळं पाहूनच लग्न करायची भीती वाटते, अशी भन्नाट प्रतिक्रिया एकानं दिली. तर आज तुमची खैर नाही मिस्टर मित्तल असा रिप्लाय आयपीएस अधिकारी आर. के. वीज यांनी दिला. 

Web Title: Ips Officer Wants To Have Jalebi But Wife Warns Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Twitterट्विटर