कडक सॅल्यूट! अमेरिकेतील नदीत बुडत होती लहान मुले, स्वत:चा जीव गमावून 'या' भारतीयाने दिलं त्यांना जीवनदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:10 PM2020-08-08T16:10:46+5:302020-08-08T16:15:07+5:30

५ ऑगस्ट रोजी Reedley Beach हून तीन मुले किंग्स नदीत वाहून गेलीत. जेव्हा मनजीतने मुलांना बुडताना पाहिले तेव्हा त्याने कशाचाही विचार न करता नदीत मुलांना वाचवण्यासाठी उडी घेतली.

Indian sikh Manjeet Singh who died kids rescue drowning in America | कडक सॅल्यूट! अमेरिकेतील नदीत बुडत होती लहान मुले, स्वत:चा जीव गमावून 'या' भारतीयाने दिलं त्यांना जीवनदान!

कडक सॅल्यूट! अमेरिकेतील नदीत बुडत होती लहान मुले, स्वत:चा जीव गमावून 'या' भारतीयाने दिलं त्यांना जीवनदान!

Next

आपल्या जीवाची पर्वा न करता अनोळखी लोकांचा जीव वाचवणारे लोक आजही समाजात आहे. याचं एक उदाहरण अमेरिकेत नुकतंच बघायला मिळालं. इथे एका भारतीय पंजाबी तरूणाने नदीत बुडणाऱ्या तीन मुलांचा जीव वाचवला. मुले तर वाचली पण हा तरूणाने जगाचा निरोप घेतला.५ ऑगस्ट रोजी  Reedley Beach हून तीन मुले किंग्स नदीत वाहून गेली होती.

जेव्हा मनजीतने मुलांना बुडताना पाहिले तेव्हा त्याने कशाचाही विचार न करता नदीत मुलांना वाचवण्यासाठी उडी घेतली. एबीसी ३० च्या रिपोर्टनुसार, २९ वर्षीय मनजीत सिंह Fresno चा राहणारा होता. तो दोन वर्षांआधीच अमेरिकेत आला होता. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्याचा ट्रेनिंगचा पहिला दिवस होता. तो तिथे ट्रक ड्रायव्हिंग बिझनेससाठी गेला होता.

मनजीतला दोन ८ वर्षांच्या मुली आणि एक १० वर्षांचा मुलगा किंग्स नदीत बुडताना दिसले तर तो लगेच त्यांच्या मदतीसाठी धावून गेला. त्याने मुलांना वाचवलं, पण स्वत: पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. त्याने या मुलांची मदत करण्याआधी स्वत:बाबत एकदाही विचार केला नाही.
नंतर आजूबाजूला असलेले लोक मदतीसाठी आले आणि त्यांनी मुलांना बाहेर काढलं. पण एक मुलगी १५ मिनिटे पाण्याच बुडून होती. तिची स्थिती नाजूक आहे. ती सध्या लाइफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. 

पोलीस कमांडर Marc ediger यांनी सांगितले की, सिंह कशाचाही विचार न करता मुलांना वाचवण्यासाठी नदीत उतरला होता. दुर्दैवाने तो नदीत बुडाला आणि परत आला नाही. तो मुलांना ओळखत नव्हता. पण त्याने जसेही पाहिले मुले बुडत आहेत त्याने लगेच नदीत उडी घेतली. लोक मनजीतने केलेल्या कामाला सलाम करत आहेत. 

हे पण वाचा  :

१० वी च्या विद्यार्थ्यानं सोनू सूदकडे मागितला व्हिडीओ गेम; तेव्हा सोनू म्हणाला.... पाहा व्हायरल ट्वीट

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्यानं आईनेच हातगाडीला धक्के मारत मुलाला रुग्णालयात पोहोचवलं

Web Title: Indian sikh Manjeet Singh who died kids rescue drowning in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.