अरे देवा! चितेवर ठेवणार इतक्यात पुन्हा श्वास घेऊ लागली महिला, डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:33 PM2021-04-29T16:33:36+5:302021-04-29T16:39:57+5:30

स्मशानभूमीत सर्व तयारी झाली होती. महिलेला चितेवर ठेवणार इतक्यात परिवारातील लोकांच्या लक्षात आलं की, महिलेचा श्वास सुरू आहे

Hospital declared dead woman pulse pyre alive Raipur Chhattisgarh | अरे देवा! चितेवर ठेवणार इतक्यात पुन्हा श्वास घेऊ लागली महिला, डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित...

अरे देवा! चितेवर ठेवणार इतक्यात पुन्हा श्वास घेऊ लागली महिला, डॉक्टरांनी केलं होतं मृत घोषित...

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे डॉक्टरांवर याचा दबाव वाढताना दिसत आहे. छत्तीसगढच्या रायपूरमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका वयोवृद्ध महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि त्या महिलेला परिवारातील लोक अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले. 

स्मशानभूमीत सर्व तयारी झाली होती. महिलेला चितेवर ठेवणार इतक्यात परिवारातील लोकांच्या लक्षात आलं की, महिलेचा श्वास सुरू आहे. त्यांनी लगेच डॉक्टरांना महिलेची पल्स चेक करण्यासाठी बोलवलं. चेक केल्यावर डॉक्टरांनी महिलेला जिवंत घोषित केलं. (हे पण वाचा : रक्तापेक्षा मोठं मैत्रीचं नातं! कुटुंबियांनी फिरवली पाठ, ४०० किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नि!)

रायपूरमध्ये राहणाऱ्या ७३ वर्षीय लक्ष्मीबाई अग्रवाल या दुपारी तीन ते चार वाजता जेवण करताना अचानक बेशुद्ध झाल्या. त्यांना लगेच उपचारासाठी डॉ. भीमराव आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इमरजन्सीमद्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी वयोवृद्ध महिलेची ईसीजी केली आणि काही वेळाने तिला मृत घोषित करत परिवाराला माहिती दिली. नंतर परिवारातील लोक मृतदेह घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. तिथून ते स्मशानभूमीत गेले. तिथे अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली होती. (हे पण वाचा : हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!)

महिलेला चितेवर ठेवणार इतक्यात लोकांच्या लक्षात आले की, महिलेचा श्वास सुरू आहे. लगेच एका प्रायव्हेट डॉक्टरला चेकअपसाठी बोलवण्यात आलं. डॉक्टरने सांगितलं की, पल्स चालू आहे. त्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पुन्हा महिलेला त्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जिथे तिला मृत घोषित करण्यात आलं होतं.  
 

Web Title: Hospital declared dead woman pulse pyre alive Raipur Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.