आजीबाई पुढे कोब्राही झाला फुस्स...एका हाताने पकडून फरपटत नेला बाहेर, पाहा हा दबंग आजीचा Viral व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:49 PM2020-05-26T15:49:53+5:302020-05-26T15:56:24+5:30

‘साप’ नुसतं ऐकूनही अंगावर काटा येतो.त्याला प्रत्यक्षात पाहून काय गत होईल याची कल्पनाही करवत नाहीय.

Grandma Drags Cobra And Throw It Away Twitter Users | आजीबाई पुढे कोब्राही झाला फुस्स...एका हाताने पकडून फरपटत नेला बाहेर, पाहा हा दबंग आजीचा Viral व्हिडीओ

आजीबाई पुढे कोब्राही झाला फुस्स...एका हाताने पकडून फरपटत नेला बाहेर, पाहा हा दबंग आजीचा Viral व्हिडीओ

googlenewsNext
साधा कॉक्रोच जरी दिसला तरी घरभर उड्या मारतो. मात्र सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राची मदत घेतली जाते. मात्र एका आजीनेच कोब्रालाच घडवली चांगली अद्दल असे कधी ऐकले आहे का? त्याचे असे झाले की, सध्या लॉकडाऊन मुळे अनेक प्राणी रस्त्यांवर मोकळ्यात फिरत आहेत. अशात सापांचा वावरही वाढला आहे. अशाच एका परिसकरात एक साप फिरत होता. फिरणारा साप हा साधा सुधा नसून क्रोब्रा होता. कोब्रा पाहून परिस्थिती काय होईल हे वेगळं सांगायला नको.

‘साप’ नुसतं ऐकूनही अंगावर काटा येतो. त्याला प्रत्यक्षात पाहून काय गत होईल याची कल्पनाही करवत नाहीय! मात्र आजी निघाली दबंग आजी तिच्यापुढे सापालाही भरली असेल धडकी. आजीने थेट कोब्रालाचा हातात पकडून फरफटत बाहेर नेले. मोठ्या जोरात हवेत लांबवर त्याला फेकून दिले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून आजीबाईच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे अशा कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल पण आजीने कसे बरे हे धाडस केले असेल या विचाराने व्हिडीओ पाहण्याची तुमचीही उत्सुकता वाढेल.या व्हिडीओला आतापर्यंत ४७ हजार लोकांनी पाहिला असून तीन हजाराहून अधिक लोकांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अवघ्या काही तासातच तुफान व्हायरल झाला आहे.

Web Title: Grandma Drags Cobra And Throw It Away Twitter Users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.