बापरे! एकेकाळी गजबजलेलं असणारं शहर 'या' भीतीने रातोरात झालं रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:37 PM2020-05-26T18:37:10+5:302020-05-26T18:52:24+5:30

जर असं नसतं झालं तर, त्या शहरातील सगळ्यांच लोकांना मृत्यू झाला असता.

Ghost town of pennsylvania centralia mine fire burning for over 50 years myb | बापरे! एकेकाळी गजबजलेलं असणारं शहर 'या' भीतीने रातोरात झालं रिकामं

बापरे! एकेकाळी गजबजलेलं असणारं शहर 'या' भीतीने रातोरात झालं रिकामं

Next

एकेकाळी गजबजलेलं असणारं शहर एका रात्रीच संपूर्ण खाली झालं. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अशाच अनोख्या आणि भीतीदायक घटनेबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही घटना अमेरिकेतील आहे. ५८ वर्षीपूर्वी अमेरिकेत ही खळबळजनक घटना घडली होती.

अमेरिकेतील पेन्सिलवेनियामधील सेंट्रालिया हे शहर एका रात्री संपूर्ण खाली करण्यात आलं. जर असं नसतं झालं तर, त्या शहरातील सगळ्यांच लोकांचा मृत्यू झाला असता. हे शहर आजच्या तारखेला सुद्धा सामसुम आहे. 'घोस्ट टाऊन' नावाने या शहराला ओळखलं जातं. सध्या लोक या शहरात फिरण्यासाठी किंवा भेट द्यायला जातात पण जागोजागी बोर्ड लावून या शहराच्या धोक्याबाबत सांगितले जाते. 

या शहरात जमिनीच्या खाली भयंकर आग लागली होती.  ही आग ५८ वर्ष तशीच असल्याचं मानलं जातं. सेंट्रालियातील हे रहस्य जगभरातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलं आहे. या शहरात एकेकाळी १४०० च्या आसपास लोक राहत होते. पण २०१७ पर्यंत या शहरातील लोकसंख्या फक्त ५ इतकी राहिली. घोस्ट टाऊन नावाने ओळखलं जाणारं हे शहर कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध होतं.

असं मानलं जातं की,  या शहरात कचऱ्यामुळे आग लागली होती.  ही आग हळूहळू जमीनीच्या तळापर्यंत पोहोचली. नंतर जमीनीच्या आतील कोळश्याच्या खाणीपर्यंत ही आग पोहोचून भयंकर वाढत गेली. त्यामुळे शहरात कार्बन मोनोक्साईड सारख्या विषारी वायूचा प्रसार झाला. म्हणून शहारात वास्तव्यास राहत असलेल्या लोकांनी हे शहर सोडले.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रालियामधील जमिनीच्या आत आजसुद्धा कोळसा आहे. ही आग लागल्यामुळे शहरातील संपूर्ण रस्ते जळले. या रस्त्यांवरील भेगांमधून धूर येत असतो. अमेरिकेतील सरकारने ही आग विजवण्यासाठी प्रयत्न केले असते पण त्यासाठी मोठ्या  प्रमाणावर खर्च करावा लागला असता म्हणून त्यावेळच्या सरकाने आग विजवण्यापेक्षा लोकांना सुरक्षित ठेवण्याासाठी रातोरात  शहरातून इतर ठिकाणी हलवण्याचा मार्ग निवडला.

ना लॉकडाऊन ना टेस्टिंग तरीसुद्धा 'या' देशाने कोरोनाला हरवलं; जाणून घ्या कसं

बाबो! लॉकडाउनमुळे झाली गडबड, 'इथे' चार पटीने वाढला डासांचा आकार!

Web Title: Ghost town of pennsylvania centralia mine fire burning for over 50 years myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.