पाकिस्तानात खोदकाम करताना सापडला शेकडो वर्ष जुना भुयार, पाहून अवाक् झाले लोक....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:42 PM2021-05-14T17:42:27+5:302021-05-14T17:49:10+5:30

लाहोर किल्ल्यात २१ स्मारकं आहेत. ज्यातील काही सम्राट अकबराच्या काळातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून या किल्ल्यात डागडुजीचं काम सुरू आहे.

Four hundred years old tunnel found during restoration at Lahore fort in Pakistan | पाकिस्तानात खोदकाम करताना सापडला शेकडो वर्ष जुना भुयार, पाहून अवाक् झाले लोक....

पाकिस्तानात खोदकाम करताना सापडला शेकडो वर्ष जुना भुयार, पाहून अवाक् झाले लोक....

Next

जग हे वेगवेगळ्या रहस्यांनी आणि आश्चर्यानी भरलेलं आहे. सतत अशा काही गोष्टी समोर येत ज्या वाचून थक्क व्हायला होतं. अनेक रहस्य उलगडली जातात तर रहस्य रहस्यच राहतात. पाकिस्तानात खोदकाम करताना एक भूयारी मार्ग सापडलाय, ज्याबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले. असं सांगितलं जात आहे की, ही भूयारी मार्ग चारशे वर्ष जुना आहे.  या भूयारी मार्गही एक गुप्त मार्ग आहे. चला जाणून घेऊ याचं रहस्य...

लाहोर किल्ल्यात २१ स्मारकं आहेत. ज्यातील काही सम्राट अकबराच्या काळातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून या किल्ल्यात डागडुजीचं काम सुरू आहे. यादरम्यान हा भुयारी मार्ग आढळून आला. असं सांगितलं जात आहे की, हा भुयारी मार्ग आधीसारखाच मजबूत आहे. तो पूर्णपणे हवेशीर आहे. इतकंच नाही तर यात आत प्रकाशही येतो. भुयारात आणखी एक गुप्तमार्ग आहे. असंही म्हटलं जात आहे की, या भुयाराचा वापर गुप्त मार्ग आणि पाणी निचऱ्यासाठी केला गेला होता. (हे पण वाचा : अजबच आहे! १६ बायकांचा धनी अन् १५० मुलं; म्हणे, सगळ्या पत्नींना खूश ठेवणं हेच माझं काम)

लाहोरच्या मध्यभागी असलेल्या भुयाराच्या भिंती फार मजबूत आहेत. डब्ल्यूसीएलए चे उप-इंजिनिअर हाफिज उमरन जे इथे खोदकाम करत होते त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी जेव्हा मोती मस्जिद आणि मकतब खाना यांच्या नुतनीकरणाचं काम सुरू केलं गेलं होतं तेव्हा खोदकाम करताना भुयाराचे निशाण आढळले होते.  (हे पण वाचा : छोट्या कपड्यांमुळे महिलेसोबत पार्कमध्ये गैरवर्तन, पाच वर्षांसाठी घातली तिच्यावर बंदी)

प्राचीन जलमार्गातून पाण्याचा निचरा आणि पावसाचं पाणी साचवण्यासाठी ६२५ फूट लांब या भुयाराची डागडुजी करण्यात आली होती. पावसाच्या दिवसात किल्ल्यात भुयारांमध्ये पाणी जमा होत होतं. ज्यामुळे किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागांचं नुकसान होत होतं. 

ते म्हणाले की, खोदकाम करताना भुयारात अनेक साप आणि विंचू सापडले. हाफिज म्हणाले की, आम्हाला आनंद आहे की, भुयार अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पुरातत्व तज्ज्ञांचं मत आहे की, या किल्ल्याचे सात थर होते. असे म्हणतात की, हा किल्ला सात वेळा उद्ध्वस्त  केला गेला आणि सात वेळा बनवला गेला.
 

Web Title: Four hundred years old tunnel found during restoration at Lahore fort in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.