माँ तुझे सलाम! कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता चिमुकल्याला घेऊन राहिली बंदोबस्तासाठी उभी....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:41 PM2020-02-24T15:41:52+5:302020-02-24T15:59:19+5:30

संगीता रायचंद नगर रोडवर बंदोबस्तासाठी होत्या. त्या ठिकाणी त्यानी आपली नोकरी करण्यासोबतच आपल्या बाळाची सुद्धा काळजी घेतली.

female policeman with one year old son posted for trumps program | माँ तुझे सलाम! कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता चिमुकल्याला घेऊन राहिली बंदोबस्तासाठी उभी....

माँ तुझे सलाम! कर्तव्याकडे दुर्लक्ष न करता चिमुकल्याला घेऊन राहिली बंदोबस्तासाठी उभी....

Next

गुजरातमधिल वडोदरा या शहरात गोरवा पोलिस स्थानकात एक महिला पोलीस कॉंन्टेबल कार्यरत आहे. ही महिला कॉन्टेबल आणि एका बाळाची आई अशा दोन्ही भूमिका पूर्ण करत आहे. या महिला कॉंस्टेबलचे नाव संगीता परमार आहे. या महिलेला ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमासाठी  बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले  होते.  या महिलेचा लहान मुलगा फक्त एक वर्षाचा आहे तरीसुद्धा ही महिला आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे. 

संगीताने असं सांगितलं की काम करत  असाताना तीचा लहान मुलगा खूप त्रास देतो. अनेकदा नोकरीमुळे तिला स्तनपान करण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो.  पण तरी सुद्धा ही महिला जबाबदारी पूर्ण करण्यासाठी धडपड करत असते. नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमादरम्यान या पोलीस कॉन्टेबलचा आणि तिच्या बाळाचा फोटो चर्चेचा विषय ठरले आहे. 

संगीता परमार या महिलेला १९ फेब्रवारीला ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमासाठी बंदोबस्ताला पाठवणार असल्याचे समजले. तेव्हा तीने तिच्या वरिष्ठांना आपल्या चिमुकल्याच्या डोळ्यात इन्फेक्शन झाल्याची घटना सांगितली. पण तरी सुद्धा आपली नोकरी आणि जबाबदारी लक्षात घेता संगीता अहमदाबादला बंदोबस्तासाठी पोहोचल्या. संगीता रायचंद नगर रोडवर बंदोबस्तासाठी होत्या. त्या ठिकाणी त्यानी आपली नोकरी करण्यासोबतच आपल्या बाळाची सुद्धा काळजी घेतली. संगीता यांनी आपल्या बाळासाठी झाडाला कपड्यांचा पाळणा तयार केला होता.  संगीताची बाळासाठी चाललेली धडपड आणि जबाबदारी पूर्ण करण्याचे प्रयत्न दिसून येतात.  

संगीताने आपल्या बाळासाठी पाळणा तयार केला. बंदोबस्तासाठी असलेल्या स्थळाच्या २४ किलोमीटर अंतरावर ती आपल्या नातेवाईकांकडे थांबलेली. पण बाळाला स्तनपान करणं तितकचं गरचेचं असल्यामुळे ती आपल्या बाळाला सोबत घेऊन निघाली. 

Web Title: female policeman with one year old son posted for trumps program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.