कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड

By manali.bagul | Published: January 19, 2021 02:13 PM2021-01-19T14:13:47+5:302021-01-19T14:21:56+5:30

Trending Viral News in Marathi : एका लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशी लग्नपत्रिका यापुर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल. 

Faimly prints qr code on wedding card so guests can gift money through upi apps amid the pandemic | कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड

कमालच केली राव! नवरा नवरीला नातेवाईकांनी आहेर पाठवावा म्हणून कुटुंबानं पत्रिकेत केला जुगाड

Next

कोरोनाच्या माहामारीने सगळ्यांनाच न्यू नॉर्मलच्या साच्यात बंद केले आहे. कोरोना माहामारी आणि लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम समारंभांवर दिसून आला. खासकरून अनेकघरांमध्ये  लोकांनी साध्या पध्दतीने, शासनाच्या नियमांचे पालन करत लग्न उरकलं. सगळ्या नातेवाईकांना लग्नात सहभागी करून घेण्यासाठी ऑनलाईन, डिजीटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. व्हाट्सअॅपवरून नातेवाईकांना पत्रिका पाठवण्यात आल्या तर अनेक ठिकाणी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लग्नाला हजेरी लावण्यात आली. अशाच एका लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशी लग्नपत्रिका यापुर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल. 

तामिळनाडूच्या मदुरैमधील एका कुटुंबानं लग्न पत्रिकेवर गुगल पे आणि फोन पे चे QR कोड छापले आहेत. जेणेकरून जे लोक लग्नाला येऊ शकणार नाहीत. ते ऑनलाईन क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसै पाठवू शकतात. रिपोर्ट्नुसार शिवशंकरी आणि सरवनन यांनी कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता आपल्या मित्र मैत्रिणींसाठी आणि नातेवाईकांसाठी लग्न पत्रिकेवर क्यूआर कोड लावण्याची संकल्पना राबवली. जवळपास ३० लोकांनी याचा वापर करत नवरा नवरींपर्यंत आपले आहेर पोहोचवले.

हे लग्न रविवारी पार पडलं असून सध्या या लग्नपकत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या कल्पनेचं भरभरून कौतुक केलं आहे. ही पत्रिका पाहिल्यानंतर नवरा- नवरीला आपल्या मित्र मैत्रिणींचे फोन यायला  सुरूवात झाली.  अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली

गेल्या महिन्यातही केरळमधील एक लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. या मंडळीने लग्नाचं जेवण आपल्या नातेवाईकांना घरपोच पुरवलं होतं. यासाठी त्यांनी चार रंगेबीरेगी बॅग्स आणि केळ्याची पानं पाठवली होती.  खरं की काय? कोरोनाच्या भितीनं पठ्ठ्या ३ महिने एयरपोर्टवरच राहिला; पोलिसांना कळलं अन् मग.....

Web Title: Faimly prints qr code on wedding card so guests can gift money through upi apps amid the pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.