जुळ्या भावाला तुरूंगात बंद करून पळण्याचा प्रयत्न करत होता कैदी, पण असा फेल झाला प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:20 PM2022-05-02T19:20:45+5:302022-05-02T19:21:38+5:30

Jarahatke : इंग्लंडमधील एका कैद्याने आपल्या जुळ्या भावाचा फायदा घेण्याचा प्लान केला. पण तो त्यात अपयशी ठरला. त्याचा प्लान होता की, आपल्या भावाला आपल्या जागी ठेवून तो तुरूंगातून बाहेर जाणार.

England prisoner attempts to break prison switching places with twin brother | जुळ्या भावाला तुरूंगात बंद करून पळण्याचा प्रयत्न करत होता कैदी, पण असा फेल झाला प्रयत्न...

जुळ्या भावाला तुरूंगात बंद करून पळण्याचा प्रयत्न करत होता कैदी, पण असा फेल झाला प्रयत्न...

googlenewsNext

Jarahatke :  बऱ्याचदा जुळ्या लोकांचे चेहरे तंतोतंत सारखे असतात. अशावेळी दोन एकसारखे चेहरे असण्याचा काय फायदा होतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता. इंग्लंडमधील एका कैद्याने आपल्या जुळ्या भावाचा फायदा घेण्याचा प्लान केला. पण तो त्यात अपयशी ठरला. त्याचा प्लान होता की, आपल्या भावाला आपल्या जागी ठेवून तो तुरूंगातून बाहेर जाणार. पण यात त्याला यश आलं नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या एका तुरूंगात कुत्रा चोरी करणारा एक २४ वर्षीय आरोपी एलहाज कैद होता. नुकतंच त्याने असं काम केलं ज्याने तो जवळपास या प्लानमध्ये यशस्वी ठरणारच होता. पण अचानक वेळेवर सगळं फिस्कटलं आणि त्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला. झालं असं की, एलहाजला एक जुळा भाऊ आहे जो परिवारातील सदस्यांसोबत त्याला तुरूंगात भेटण्यासाठी आला होता.

पोलिसांच्या एका सूत्रानुसार, तुरूंगातील एका भागात कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जाते. यावेळी त्यांच्यात कोणतीही भींत किंवा काचेची भींत नसते. ते एकमेकांसमोर भेटतात. एकमेकांना स्पर्श करू शकतात. एलहाजचे कुटुंबिय त्याला भेटायला आले तेव्हा त्यांच्यात काही वेळ संवाद झाला. भेटीची वेळ संपल्यावर एलहाजचा भाऊ आपोआप इतर कैद्यांसोबत जाऊ लागला आणि मुख्य आरोपी एलहाज हा कुटुंबियांसोबत हळूहळू बाहेर येऊ लागला होता.

पण समस्या तेव्हा झाली तेव्हा एका पोलिसवाल्याने हे सगळं फार बारकाईने पाहिलं. त्याने लक्ष दिलं की, जेव्हा एलहाज रूममधून बाहेर आला होता तेव्हा त्याचे कपडे वेगळे होते आणि परत येत असताना त्याचे कपडे वेगळे होते. हे बघून त्याने समजून घेतलं की, काहीतरी गडबड आहे. त्याने लगेच त्याच्या कुटुंबियांना रोखलं आणि एलहाजला पकडलं. यानंतर एलहाजला तुरूंगाने तुरूंगातून पळून जाणाऱ्या कैद्यांच्या यादीत टाकलं आणि दुसऱ्या तुरूंगात पाठवलं.
 

Web Title: England prisoner attempts to break prison switching places with twin brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.