कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:57 AM2020-07-07T10:57:39+5:302020-07-07T11:37:31+5:30

50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे.

Elderly couple from Kerala who donates homes for poor | कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

googlenewsNext

आजकाल प्रॉपर्टीसाठी कुठे भाऊच भावाचा खून करतो तर कुठे बापाला जीवे मारलं जातं. दुसरीकडे सध्या घराच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, गरीबांना तर घर घेण्याचं स्वप्नही पडत नसेल. अशात एक वयोवृद्ध कपल गरीबांसाठी एक फारच कमालीचं काम करत आहे. केरळच्या थ्रिसूरमधील 80 वर्षीय Koratty Varghese हे पाच गरीबांना दान देण्यासाठी चक्क घर तयार करत आहेत. या वयोवृद्ध जोडप्याचं हे काम अवाक् तर करतच सोबतच प्रेरणा देणारंही ठरतं. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळच्या Thangaloor मधील अवानूर पंचायतमध्ये राहणारे 80 वर्षीय Koratty आणि त्यांची पत्नी Philomena हे दोघेही त्यांत्या जमिनीवर हे घर तयार करत आहेत. हे घर ते पाच गरीबांना दान देणार आहेत. हे कपल घर तयार करण्यासाठी येणारा खर्चही स्वत: करत आहेत. त्यांनी आयुष्यभर बचत केलेला पैसा ते यासाठी वापरत आहेत. Varghese हे सेनेत होते तर त्यांची पत्नी शिक्षिका होत्या.

Varghese सांगतात की, 'मी गरीबी फार जवळून पाहिली आहे. मी गरीबीमुळेच माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. माझ्या आई-वडिलांना सहा मुलं होती. त्यातील दोन तर तीन वर्षांचे होण्याआधीच मरण पावले. मुलगा मी एकटाच राहिलो आणि तीन बहिणी. त्यामुळे मला लहान वयातच काम करावं लागलं होतं. 22 व्या वर्षी मी सेनेत भरती झालो. नंतर 15 वर्षांनी रिटायर झालो'.

त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या. त्यांनीही पतीला पूर्ण साथ दिली. रिटायरमेंटनंतर वर्गीस यांनी काही व्यापारही सुरू केला होता. ते सांगतात की, जुन्या काही गोष्टी आठवल्या की फार दु:खं होतं. आता त्यांनी विचार केला की, ते लोकांची मदत करू शकतात. त्यामुळे त्यांनी पाच गरीब परिवारांना घर देण्याचा निर्णय घेतला.

ज्या जमिनीवर ते घर तयार करत आहेत ती जमीन त्यांनी 1981 मध्ये खरेदी केली होती. या घरात प्रत्येक फ्लोर 600 स्क्वेअर फूटचं असले. अंदाज लावण्यात आला आहे की, प्रत्येक फ्लोर तयार करण्यासाठी 7 लाख रूपये खर्च येऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी अजून स्थानिकांना हे सांगितले नाही की, ते हे भलं काम करत आहेत. 

50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. ते म्हणतात की, 'वृद्धाश्रम माझं स्वप्न आहे. पण माहीत नाही ते पूर्ण होतं की नाही.

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं

जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड

Web Title: Elderly couple from Kerala who donates homes for poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.