डॉक्टरने महिलेला सांगितलं भयानक असं काही, ऐकून आईचा झाला मृत्यू तर बॉयफ्रेन्ड गेला सोडून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:36 PM2021-10-08T12:36:58+5:302021-10-08T12:37:37+5:30

घटनेचं सत्य समोर आलं तेव्हा महिला चांगलीच संतापली. तिने ही संपूर्ण घटना टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.

The doctor told the woman that something terrible had happened | डॉक्टरने महिलेला सांगितलं भयानक असं काही, ऐकून आईचा झाला मृत्यू तर बॉयफ्रेन्ड गेला सोडून

डॉक्टरने महिलेला सांगितलं भयानक असं काही, ऐकून आईचा झाला मृत्यू तर बॉयफ्रेन्ड गेला सोडून

Next

डॉक्टरही अनेकदा अजब काम किंवा चुका करतात आणि त्यांच्या या चुकांमुळे लोकांना महागात पडतात. एका टिकटॉक यूजरसोबत असाच एक भयावह किस्सा झाला. @elzbthhope नावाच्या टिकटॉक यूजरच्या आयुष्यात डॉक्टरच्या चुकीमुळे मोठा बदल झाला. तिची आई नेहमीसाठी तिच्यापासून दूर गेली. तसेच या घटनेनंतर तिच बॉयफ्रेन्ड तिला सोडून गेला. मात्र, घटनेचं सत्य समोर आलं तेव्हा महिला चांगलीच संतापली. तिने ही संपूर्ण घटना टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.

डॉक्टरने केली मोठी चूक 

महिलेने व्हिडीओत सांगितलं की, नेहमीच्या चेकअपसाठी महिला डॉक्टरला भेटली. २० वर्षापासून प्रॅक्टिस करत असलेल्या ऑब्सटेट्रिक्स गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टरने तिला सांगितलं की, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. हे ऐकून महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली. तिला यावर विश्वासच बसला नाही. तिची आई हिस्टीरियाची शिकार होती. जेव्हा तिला तिच्या मुलीबाबत समजलं तर या धक्क्यानेच त्यांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर महिलेच्या आजाराबाबत जाणून घेतलं तर तिचा बॉयफ्रेन्डही तिला सोडून गेला.

मग समोर आलं सत्य

'द सन' ने आपल्या रिपोर्टमध्ये महिलेच्या हवाल्याने सांगितलं की, 'डॉक्टरांनी ही एचआयव्ही माहीत देत हेही सांगितलं की, आम्ही प्रयत्न करू की, तुम्ही जास्तीत जास्त जगावं. मी बराच वेळ धक्क्यात होते. त्यानंतर अनेक आठवडे मी दुसऱ्या डॉक्टरांकडून टेस्ट केल्या. त्यात समोर आलं की, मला कोणताही आजार नाही. इतकंच काय तर ते दुसरे डॉक्टर असंही म्हणाले की, आम्हाला समजत नाहीये की, कोणत्या आधारावर तुम्हाला एचआयव्ही पॉझिटिव्ह ठरवण्यात आलं. तुम्हाला कोणताही आजार नाहीये. त्यानंतर मी पुन्हा महिला डॉक्टरकडे गेली. तेव्हा ती म्हणाली की, मला हे जाणून घेऊन आनंद झाला की, तुम्ही एचआयव्ही  नाहीत'.

टिकटॉक यूजरकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 847k पेक्षा जात व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच मोठ्या संख्येने लोक कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'मी कल्पनाही करू शकत नाही की, हे सगळं झाल्यावर तुला कसं वाटलं असेल'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'मी आणखी काही अशा लोकांना ओळखतो, ज्यांना चुकीचं डायग्नोसिस केलं गेलं. त्यामुळे एकापेक्षा जास्त डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं'.
 

Web Title: The doctor told the woman that something terrible had happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.