8 वर्षापूर्वी मृत झालेली गर्लफ्रेंड त्याच्याशी गप्पा मारते, पत्र लिहिते...कसं झालं हे शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:29 PM2021-07-26T18:29:34+5:302021-07-26T18:50:13+5:30

एखाद्या मृत व्यक्तीला पुन्हा जिंवत करणे अशक्यच पण तरीही एका व्यक्तीनं अशी किमया केली आहे की ज्यामुळे, त्याच्या आयुष्यातील मृत झालेली व्यक्ती त्याच्याशी बोलू तर शकतेच पण त्याला पत्रही लिहु शकते.

dead fiancé jessica brings back ai chatbot joshua barbeau artificial intelligence canada | 8 वर्षापूर्वी मृत झालेली गर्लफ्रेंड त्याच्याशी गप्पा मारते, पत्र लिहिते...कसं झालं हे शक्य?

8 वर्षापूर्वी मृत झालेली गर्लफ्रेंड त्याच्याशी गप्पा मारते, पत्र लिहिते...कसं झालं हे शक्य?

Next

आपल्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (death) झाला तर तिला आपण विसरू शकत नाही. तिच्या आठवणीत आपण स्वत:ला त्रास करून घेऊ लागतो. ती व्यक्ती सोडून गेलीय यावर आपला विश्वासच बसत नाही. पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही ती आपल्या जवळच असावी असे आपल्याला वाटतं. पण हे शक्य आहे का? तर, आहे! तुमचा विश्वास बसत नसेल पण एका माणसाने हे शक्य करून दाखवले आहे. एखाद्या मृत व्यक्तीला पुन्हा जिंवत करणे अशक्यच पण तरीही एका व्यक्तीनं अशी किमया केली आहे की ज्यामुळे, त्याच्या आयुष्यातील मृत झालेली व्यक्ती त्याच्याशी बोलू तर शकतेच पण त्याला पत्रही लिहु शकते.

तुम्ही टीव्हीवर अलेक्साची जाहीरात पाहिली असेल. ही अलेक्सा म्हणजेच एआय चॅटबॉट. यातील आर्टिफिशयल इंटॅलिजन्सच्या किमयेमुळे हा रोबॉर्ट माणसांशी संवाद साधु शकतो. त्यांचे आदेश एकू शकतो. असाच एक चॅट बॉट कॅनडाच्या ब्रॅडफोर्डमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय लेखक जोशुआ बारब्यू याने तयार केला. हा चॅटबॉटच्या माध्यमातून त्याने त्याची मृत गर्लफ्रेंड जेसिका परेरा हिला वर्च्युअली जिवंत केलंय.

जोशुआ बारब्यू याची होणारी पत्नी जेसिका परेरा हिचा २०१२ मध्ये गंभीर आजारामुळे मृत्यू झाला. जोशुआ आपल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) अजूनही विसरू शकलेला नाही. मागील वर्षी तो प्रोजेक्ट डिसेंबर नावाच्या वेबसाईटसोबत जोडला गेला आणि ५ डॉलर खर्चून त्यानं एक नवं बॉट बनवलं. याला त्यानं जेसिका कर्टनी परेरा हिचं नाव दिलं. या बॉटमध्ये आपल्या गर्लफ्रेंडबाबतची माहिती टाकल्यानंतर तो तिच्यासोबत बोलू लागला (Writer Brought Her Girlfriend Back as an AI Chatbot). जोशुआ बारब्यू यानं जेसिका परेरा हिचं जुनं फेसबुक अकाउंट, टेक्स्ट मेसेज आणि इतर काही माहिती टाकून बरोबर तिच्याप्रमाणेच उत्तर देणारं एक सॉफ्टवेअर तयार केलं. हे सॉफ्टवेअर लव्ह लेटरपासून कामासाठीचा टेक्स्टदेखील लिहू शकतं आणि हे समोरच्यासोबत शेअर करू शकतं.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जोशुआ बारब्यू यानं प्रोजेक्ट डिसेंबरबद्दल ऐकलं. ते आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचा वापर करून चॅट बॉट बनवतात. GPT-3 सॉफ्टवेअरवर चालणारं हे बॉट कोणत्याही प्रकारचे जुने टेक्स्ट मेसेज आणि रायटिंग स्किलचा वापर करून त्या व्यक्तीप्रमाणेच बोलू लागतं. इतकंच नाही तर त्याच व्यक्तीप्रमाणं लिहूदेखील लागतं.

जोशुआनं जेसिकाचे अनेक मेसेज इनपुट म्हणून वापरले आणि मग तिच्यासोबत व्हर्चुअल व्हर्जनमध्ये बोलू लागला. मात्र, विशेषतज्ञांनी असा इशारा दिला आहे, की ही पद्धत धोकादायक ठरू शकते. त्यांनी म्हटलंय की, या पद्धतीचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला जाण्याची शक्यता अधिक आहे. 
 

Web Title: dead fiancé jessica brings back ai chatbot joshua barbeau artificial intelligence canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.