बोंबला, कोरोना संकटात तरुणांनी केली पार्टी, व्हिडीओ पाहून चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:29 PM2020-05-25T15:29:53+5:302020-05-25T15:31:40+5:30

या पार्टीत सोशल डिस्टसिंग तर सोडाच या पार्टीत कोणीही मास्क लावलेला नव्हता. इतकेच काय तर सगळेच एकमेकांना गळाभेट करत होते.

Covid-19 Missouri Pool Party At- lake Of The Ozarks Crowd ignore Social Distancing See Viral Video-SRJ | बोंबला, कोरोना संकटात तरुणांनी केली पार्टी, व्हिडीओ पाहून चिंता वाढली

बोंबला, कोरोना संकटात तरुणांनी केली पार्टी, व्हिडीओ पाहून चिंता वाढली

Next

देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग सर्वात महत्वाचे आहे सर्वांनाच माहिती झाले आहे. मात्र काही अतिउत्साही तरुणांनी जस्ट फॉर फन म्हणत भली मोठी पार्टी केली. यात सोशल डिस्टसिंगचा नियम तर सोडाच, पण जग सध्या कोणत्या संकटातून जात आहे याचा लवलेशही या तरुणांमध्ये दिसत नव्हता. 

अमेरिकेतील सेंट्रल मिसूरी या शहरात हा प्रकार घडला आहे. या पार्टीत सोशल डिस्टसिंग तर सोडाच या पार्टीत कोणीही मास्क लावलेला नव्हता. इतकेच काय तर सगळेच एकमेकांना गळाभेट करत होते. एकमेकांजवळ जावून सेल्फी घेत होते तर काही रोमान्स करण्यात मग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील केंटुकी राज्यातील 20 वयोगटातील तरुणांनी नुकतीच कोरोना व्हायरस पार्टी साजरी केली. त्यांनी लॉकडाउनचं उल्लंघन करत एकत्र येऊन ही पार्टी केली. त्यानंतर पार्टीतील सहभागी झालेल्या तरुणांचे कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना व्हायरस पार्टीमध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

अमेरिकेत कोरोना व्हासरसबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. साधारण प्रत्येक राज्यात हा इशारा दिला  गेला आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियातील आणि इतरही ठिकाणांवरील लोकांना घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला होता. आता अनेक लोक घरातच आहेत. पण काहींना यांचं गांभीर्य कळत नाहीये. त्यामुळे सर्रास बीच पार्टी, पुल पार्टी आणि कोरोना पार्टी करत कोरोनाचे संक्रमन होत आहे. अमेरिकेत दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू केला असता तर कोरोना विषाणू संसर्गामुळे ८३ टक्के प्राण वाचवता येऊ शकले असते. कोलंबिया विद्यापीठातील एका अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे.

Web Title: Covid-19 Missouri Pool Party At- lake Of The Ozarks Crowd ignore Social Distancing See Viral Video-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.