बाबो! कोरोनाच्या भीतीने 'त्यानं' वॉशिंग मशीनमध्ये धुतले तब्बल १४ लाख रुपये; अन् मग ......

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 12:54 PM2020-08-02T12:54:11+5:302020-08-02T13:00:53+5:30

ही घटना वाचून तुम्ही हैराण व्हाल. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीनं एका व्यक्तीने मोठ्या संख्येने नोटा वॉशिंग मशीन मध्ये धुतल्या आहेत. 

coronavirus fear wash 14 lakh rupees in washing machine in south korea | बाबो! कोरोनाच्या भीतीने 'त्यानं' वॉशिंग मशीनमध्ये धुतले तब्बल १४ लाख रुपये; अन् मग ......

बाबो! कोरोनाच्या भीतीने 'त्यानं' वॉशिंग मशीनमध्ये धुतले तब्बल १४ लाख रुपये; अन् मग ......

Next

कोरोना व्हायरसच्या माहामारीने जगभरात थैमान घातलं आहे. या जीवघेण्या  व्हायरसपासून बचावसाठी लोक सावधगिरी बाळगताना दिसून येत आहेत. घरातून बाहेर निघाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगंच पालन करणं. मास्कचा वापर करणं, याबाबत लोक जागरूकता दाखवताना दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाच्या भीतीने घडलेलं एक कृत्य समोर आलं आहे. ही घटना वाचून तुम्ही हैराण व्हाल. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीनं एका व्यक्तीने मोठ्या संख्येने नोटा वॉशिंग मशीन मध्ये धुतल्या आहेत. 

प्रतीकात्मक तस्वीर

ही घटना दक्षिण कोरियातील आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातील सिओस भागातील अंसन या शहरात राहत असलेल्या एका व्यक्तीने कोरोनाच्या भीतीने आपले सगळे पैसै सॅनिटाईज आणि डिस्इंफेक्ट्ंट केले आहे. जवळपास १४ लाख रुपये या माणसाने वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकले आहेत. त्यानंतर या नोटा सुकवण्यासाठी ओवनमध्ये टाकल्या. त्यामुळे अनेक नोटा या पूर्णपणे जळाल्या आहेत.  अशा पद्धतीनं नोटा स्वच्छ केल्यामुळे सगळेजण हैराण झाले आहेत.

प्रतीकात्मक तस्वीर

१४ लाखांच्या नोटांचे नुकसान झाल्यानंतर हा माणूस बँक ऑफ कोरियामध्ये नोट बदलण्यासाठी विचारपूस करण्यास गेला. बँकेच्या अधिकारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार  त्यांनी या व्यक्तीला नोटा बदलून दिल्या नाहीत. कारण ज्यावेळी ती व्यक्ती नोटा बदलण्याासाठी बँकेत पोहोचली तेव्हा नोटांची अवस्था खूपच खराब होती. बँकेच्या नियमांनुसार नोटा बदलून देणं शक्य नव्हतं. या माणसाबाबत कोणतीही वैयक्तीक माहिती बँकेकडून देण्यात आलेली नाही. पैश्यांना अशा पद्धतीने स्वच्छ करण्याची बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

Web Title: coronavirus fear wash 14 lakh rupees in washing machine in south korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.