बापाची माया! 2 महिन्यांच्या बाळाला कोरोनापासून वाचवण्यासाठी घरीच तयार केलं Baby Pod!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:12 PM2020-03-31T12:12:32+5:302020-03-31T12:18:02+5:30

आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी त्यांनी हा खास पॉड तयार केला आहे.

Chinese man cat carrier modify into baby pod t save child from Coronavirus api | बापाची माया! 2 महिन्यांच्या बाळाला कोरोनापासून वाचवण्यासाठी घरीच तयार केलं Baby Pod!

बापाची माया! 2 महिन्यांच्या बाळाला कोरोनापासून वाचवण्यासाठी घरीच तयार केलं Baby Pod!

Next

चीनच्या वुहानपासून पसरलेला कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे. अशात लहान मुलांना व्हायरसपासून वाचवण्यासाठी एक बेबी पॉड तयार केलं आहे. त्यांनी मांजरीच्या बास्केटपासून हा बेबी पॉड तयार केला आहे. Cao Junjie यांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळाला या व्हायरसपासून वाचवण्यासाठी या पॉडचं डिझाइन तयार केलं आहे.

रॉयटर्स या न्यूज एजन्सीने त्यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. Cao Junjie यांनी सांगितले की, त्यांनी या पॉडमध्ये एअर क्वालिटी मॉनिटर करण्याचं काम केलं आहे. म्हणजे बाळाला किती हवेची गरज आहे हे देखील वेळोवेळी कळेल. या पॉडला समोरून टांगताही येतं आणि बाहेरही घेऊन जाता येतं. याने व्हायरससोबतच प्रदूषणापासूनही लहान मुलांचा बचाव होऊ शकतो.

Cao यांनी हा पॉड त्यांच्या बाळासाठी तयार केला. त्यांनी सांगितले की,  कोरोनाच्या थैमानानंतर ते त्यांच्या बाळाबाबत चिंतेत होते. त्यांना हा पॉड तयार करायला एक महिन्याचा वेळ लागला. 

लोकांना ही आयडिया फारच आवडली असून सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जात आहे. अनेकांना त्यांच्यासाठीही असा पॉड तयार करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Chinese man cat carrier modify into baby pod t save child from Coronavirus api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.