१२० कोटी जनता अन् फक्त १०० आडनावं; अजब चीनची 'ही' गजब गोष्ट आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:12 PM2021-01-18T19:12:07+5:302021-01-18T19:23:57+5:30

Viral News in Marathi : २०१० च्या जणगणनेच्या तुलनेत ८६ टक्के लोकांमध्ये फक्त १०० आडनावं आहेत.

China new surname numbers are decreasing in the country 43 crore population put five surname only | १२० कोटी जनता अन् फक्त १०० आडनावं; अजब चीनची 'ही' गजब गोष्ट आहे तरी काय?

१२० कोटी जनता अन् फक्त १०० आडनावं; अजब चीनची 'ही' गजब गोष्ट आहे तरी काय?

googlenewsNext

चीनमध्ये अशी काही अडनावं आहेत. त्यांना देशातील ३० टक्के लोकसंख्येनं म्हणजेच  ४३.३  कोटी लोकांनीच स्वीकारलं आहे. वांग, ली, झांग, लिऊ आणि चेन हीच ती आडनावं आहे. खरं पाहता चीनमध्ये आडनावांचा दुष्काळ पडलेला दिसून येत आहे. चीनच्या लोकसुरक्षा मंत्रालयाच्या कागदपत्रांच्या विश्लेषणानंतर याबाबत अधिक माहिती मिळाली आहे. या कागदपत्रांमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार, २०१० च्या जणगणनेच्या तुलनेत ८६ टक्के लोकांमध्ये फक्त १०० आडनावं आहेत.

स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये पहिल्यांदा  २३ हजार आडनावं प्रचलित होती. त्यानंतर यांची संख्या ६००० इतकीच राहिली आहे. बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर चेन जिआवे यांचे म्हणणे आहे की आडनावांची संख्या कमी होण्याची तीन कारणे आहेत. पहिले कारण सांस्कृतिक विविधतेची कमतरता, दुसरे भाषिक समस्या आणि शेवटचे कारण डिजिटल युगातील तांत्रिक समस्या हे आहे.

बीजिंग में ग्रेट हॉल ऑफ पीपुल में चीनी पीपुल्स पॉलिटिकल कंसल्टेटिव कॉन्फ्रेंस के उद्घाटन सत्र में फेस मास्क पहनने के प्रतिनिधि।

साहाय्याक प्राध्यापक चेन जिआवे यांनी असे नमूद केले की चीनमध्ये वंश किंवा समुदायात विविधता नाही. भाषिक कारणास्तव, चिनी भाषेमध्ये कोणतेही अतिरिक्त आडनाव जोडणे किंवा वजा करणे इतके सोपे नाही. डिजिटल जगात मागे राहू नये म्हणून बर्‍याच लोकांनी जुन्या आडनाव सोडले आणि नवीन आडनाव स्वीकारले. आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

प्राध्यापक जिआवे यांचे म्हणणे आहे की, ''चीनमधील मंदारिनसारख्या बर्‍याच बोली भाषांचा डिजिटल सिस्टममध्ये समावेश नव्हता. कॅरेक्टर स्टँडर्सचा अवलंब करून सरकारला क्यूआर कोड, संकेतशब्द किंवा पिन तयार करण्यात समस्या येत होती. ही प्रक्रिया टाळण्यासाठी लोकांनी त्यांची आडनावे बदलली. तथापि, इथल्या लोकांना दु:ख आहे की त्यांच्या पिढ्या, त्यांचा इतिहास, ओळख आणि परंपरा लोक विसरून जातील. बाबो! थंडी वाढताच ऑनलाईन विकला जातोय कोळसा; १० हजार रूपयांना लोक घेताहेत ब्रँण्डेड कोळसा

Web Title: China new surname numbers are decreasing in the country 43 crore population put five surname only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.