दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 09:44 AM2021-03-16T09:44:58+5:302021-03-16T09:45:15+5:30

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील.

Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend | दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

Next

ब्रिटनच्या एका कोर्टात एक अशी घटना समोर आली  ज्याने न्यायाधीशही हैराण झाले. येथील कोर्टात ६५ वर्षीय कोट्याधीश डॉ. क्रिस रॉलॅंड यांनी केस दाखल केली होती. ही केस होती त्यांची ६३ वर्षीय गर्लफ्रेन्ड शेरॉन ब्लेड्स विरोधात. डॉ. रोलॅंड यांचा आरोप होता की, त्यांनी आपल्या गर्लफ्रेन्डसोबत एक २५ कोटी रूपयांचा बंगला खरेदी केला होता. पण त्यांच्या गर्लफ्रेन्डने त्यांना त्या बंगल्यातून हाकलून लावलं. आणि सांगितले की, यापुढे या बंगल्यात कधी दिसू नको. खासकरून आपल्या नव्या गर्लफ्रेन्डसोबत. या विरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टानेही त्यांच्या गर्लफ्रेन्डची साथ दिली आणि म्हणाले बंगल्यावर दोघांचाही हक्क आहे. कारण बंगला दोघांच्या नावावर रजिस्टर्ड आहे.  भलेही पूर्ण पैसे डॉय रोलॅंड यांनी भरले असतील.

काय होतं प्रकरण?

डॉ. क्रिस रोलॅंड यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या पार्टनरसोबत Tadmarton House नावाचा बंगला मार्च २००९ मध्ये खरेदी केला होता. पण काही महिन्यांनी त्यांची पार्टनर त्यांच्यावर नाराज झाली आणि त्यांना बंगल्या येण्यापासून रोखलं. अशात कोर्टाने त्याच्या बाजूने निर्णय देत मालकी हक्क तिला दिले. यावर शेरॉन ब्लेड्स यांनी त्यांची म्हणणं वकिलांच्या माध्यमातून मांडलं. ते ऐकून न्यायाधीशही हैराण झाले.

दुसऱ्या गर्लफ्रेन्डसोबत रंगेहाथ पकडलं

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील. तोपर्यंत  दोघेही या बंगल्याचा वीकेंड डेस्टिनेशन म्हणून वापर करत होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनी पाहिलं की, डॉ. रॉलेंड यांचं एका दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे. ही महिला त्यांची वकील असल्याचं त्यांनी सांगितलं. याच बंगल्यात या महिलेने अनेक रात्री आणि दिवस घालवले आहेत. अशात शेरॉनला राग आला. त्या म्हणाल्या की, या बंगल्यावर दोघांचा मालकी हक्का आहे आणि दोघेही यात राहू शकतात. शेरॉन म्हणाल्या की, रोलॅंड या बंगल्यात येऊ शकतात. पण दुसऱ्या महिलेला सोबत आणू शकत नाहीत. त्यामुळे २००९ पासून २०१८ पर्यंत डॉ. रोलॅंड यांना भाड्याच्या घरात रहावं लागलं.

डॉ. रोलॅंड म्हणाले की, भाड्यासाठी त्यांनी ३ कोटी ७३ लाख रूपये खर्च केले आहेत. याची भरपाई शेरॉन यांनी दिली पाहिजे. याला उत्तर म्हणून शेरॉन म्हणाल्या की, त्यांनी ई-मेलवरूनही हे सांगितलं होतं की, ते एकटे घरात येऊ शकतात. पण दुसरी महिला चालणार नाही. यानंतर कोर्टाने जो निर्णय दिला तो ऐकून डॉ. रॉलॅंड हैराण झाले.

काय दिला निर्णय?

कोर्टाने डॉ. रोलॅंड यांची भाड्याची भरपाई देण्याची मागणी मान्य केली आणि शेरॉन यांनी त्यांना ६० लाख रूपये द्यावे असा आदेश दिला. पण कोर्टाने असाही आदेश दिला की, डॉ. रोलॅंड यांनी त्यांच्या पार्टनरला २ मिलियन यूरो म्हणजे २ कोटी १६ लाख रूपये रक्कम कोर्टाच्या कारवाईत खर्च झाली ती द्यावी. यातील ९० टक्के रक्कम डॉ. रोलॅंड यांना चुकवावीच लागेल. बाकी वकिलांचा खर्च शेरॉन देईल. अशाप्रकारे १ कोटी ८१ लाख रूपयांची रक्कम शेरोनच्या वकिलाच्या हाती लागली. घराचे मालक दोघेही राहतील.
 

Web Title: Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.