बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:05 PM2021-04-30T12:05:38+5:302021-04-30T12:05:50+5:30

अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे.

Bride refused to marry because she did not get enough jewellery | बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

Next

अनेकदा वेगवेगळ्या विचित्र कारणांनी लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी काही सीरिअस कारण असतं तर कधी कधी कारण इतकं शुल्लक असतं की, डोकं चक्रावून जातं. अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे. एका नवरीने घराच्या दारात आलेली वरात परत पाठवली. कारण नवरदेवाकडून दागिने दिले गेले नाही. 

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील पट्टी पोलीस क्षेत्रातील ही घटना आहे. मुलाकडून दागिने न मिळाल्यानं नवरीनं चक्क लग्नास नकार दिल्यामुळे नवरदेवाला दारातूनच आपली वरात माघारी घेऊन जावी लागली. हे इतक्यावरच थांबलं नाही. नंतर बोलवण्यात आलेल्या पंचायतमध्ये नवरदेवाकडील लोकांना लग्नाच्या जेवणासाठीच्या खर्चातील अर्धा खर्चही द्यावा लागला. (हे पण वाचा : काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन)

ही वरात सुल्तानपूरच्या मीरपूर क्षेत्रातील प्रतापूर येथून आली होती. वरातीमध्ये आलेल्या लोकांनी जेवणही केलं. यानंतर नवरदेवाकडून आणलेलं लग्नासाठीचं साहित्य नवरीच्या घरी पाठवण्यात आलं. इथेच सगळा गोंधळा झाला. मात्र, त्यात केवळ एकच दागिना होता. यावरूनच नवरीकडील मंडळी नाराज झाली. मग काय दोन्हीकडील मंडळीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की, नवरीनं समोर येत लग्नाला नकार दिला. यानंतर वरात नवरीविनाच माघारी परतली.

गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. यात नवरीकडच्या लोकांनी जेवणाच्या व्यवस्थेसाठी १.४० लाख रूपये खर्च झाल्याचे सांगितलं. यानंतर मुलाकडच्या लोकांनी यातील पन्नास टक्के खर्च देण्याचं ठरलं. यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनी ६० हजार रुपये दिले. १० हजार नंतर देण्याचं सांगत ते निघून गेले.
 

Web Title: Bride refused to marry because she did not get enough jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.