बोंबला! लग्न मंडपातून उठून पोलिसांच्या कारमागे धावत गेली नवरी, वाचा काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:26 PM2021-11-27T12:26:13+5:302021-11-27T12:27:05+5:30

Ecuador News : नवरी आपल्या लग्न मंडपातून उठून पोलिसांच्या गाडीमागे धावत गेली. हा नजारा बघून लग्नातील सगळेच पाहुणे हैराण झाले.

Bride chasing police car on her own wedding after groom arrested in Ecuador | बोंबला! लग्न मंडपातून उठून पोलिसांच्या कारमागे धावत गेली नवरी, वाचा काय आहे भानगड

बोंबला! लग्न मंडपातून उठून पोलिसांच्या कारमागे धावत गेली नवरी, वाचा काय आहे भानगड

Next

लग्ना समारंभात आनंदाचं वातावरण आहे. यादरम्यान नवरी आणि नवरदेव दोन्हीकडील लोक खूप एन्जॉय करतात. पण एका लग्नात असं काही झालं की, नवरी आपल्या लग्न मंडपातून उठून पोलिसांच्या गाडीमागे धावत गेली. हा नजारा बघून लग्नातील सगळेच पाहुणे हैराण झाले.

ही घटना साऊत अमेरिकेतील देश इक्वाडोरमधील (Ecuador) आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, इक्वाडोरमध्ये नवरी-नवरदेवाचं लग्न सुरू होतं. यावेळी लोक फार आनंदी होते. तेव्हाच पोलीस आले आणि नवरदेवाला आपल्या सोबत घेऊन गेले. पोलिसांनी लग्न मंडपातून नवरदेवाला अटक केली आणि गाडीत बसवलं. ते गाडीतून त्याला  नेत होते तेव्हा नवरीने कशाचाही विचार न करता ती गाडीमागे धावत गेली.

रिपोर्टनुसार, नवरी आपल्या पतीला सोडवण्यासाठी बरीच धडपड करताना दिसली. इक्वाडोरच्या एलओरो राज्यातील एल गुआबो नावाच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलीस कारने लग्नस्थळी पोहोचले आणि नवरदेवाला सोबत घेऊन गेले. यावेळी नातेवाईक नवरदेवाला सोडण्याची विनंती पोलिसांकडे करत राहिले. तर नवरीही चांगलीच संतापली होती. त्यानंतर तर नवरी चक्क पोलिसांच्या गाडीमागे धावत गेली. त्यानंतर पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करण्यासाठी ती दुसऱ्या गाडीतही बसली.

पतीला सोडवण्यासाठी नवरी पोलिसांवर चिडली सुद्धा. पण पोलिसांनी तिचं काही एक ऐकलं नाही. ते नवरदेवाला घेऊन गेले. नवरदेवाला पोलीस उचलून घेऊन गेले कारण तो त्याच्या पहिल्या पत्नीला महिन्याचा खर्च देत नव्हता. त्यासोबतच त्याने पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलांना आर्थिक मदतही केली नाही. याच कारणावरून पोलीस त्याला उचलून घेऊन गेले.
 

Web Title: Bride chasing police car on her own wedding after groom arrested in Ecuador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.