बोंबला! स्पायडर मॅनसारखी शक्ती मिळणार म्हणून तिघांनी केला डेंजर कारनामा अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:15 PM2020-05-26T12:15:44+5:302020-05-26T12:55:29+5:30

स्पायडर मॅन होण्यासाठी तीन भावांनी केलेला हा कारनामा वाचून तुम्हाला धक्काही बसेल आणि तुम्ही हैराणही व्हाल.

Boys let black widow bite them they hopes of turning into spider man api | बोंबला! स्पायडर मॅनसारखी शक्ती मिळणार म्हणून तिघांनी केला डेंजर कारनामा अन्....

बोंबला! स्पायडर मॅनसारखी शक्ती मिळणार म्हणून तिघांनी केला डेंजर कारनामा अन्....

Next

स्पायडर मॅनची क्रेझ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच बघायला मिळते. अनेक लहान मुले तर त्याच्यासारखं ड्रेसिंग करून त्याच्यासारखी अॅक्शन करतानाही दिसतात. आता तर तीन भावांनी ब्लॅक विडो कोळ्याचा स्वतःला दंश करवून घेतला. असं त्यांनी यासाठी केलं कारण त्यांना वाटलं की, कोळी चावल्यावर ते सुद्धा स्पायडर मॅन बनतील.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, तिघांचं वयही कमीच आहे. एक 12 वयाचा, एक 10 चा आणि एक 8 वर्षांचा आहे. ही घटना घडली आहे बोलिवियाच्या चायांता प्रांतात. तिघे भाऊ बकऱ्या चारायला घेऊन गेले होते. तेव्हा त्यांनी हा कारनामा केला.

तिघांनी आलटून पालटून स्वतःला कोळ्याचा दंश करवून घेतला. कोळ्याच्या दंशानंतर तिघेही रडायला लागले. त्यांच्या आईने त्यांना पाहिलं. जेव्हा आईला त्यांनी केलेल्या कारनाम्याची माहिती मिळाली ती त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली.

कोळी चावल्यावर तिघांचीही हालत खराब झाली होती. तिघांनाही भरपूर ताप आला आणि त्यांच्या मसल्समध्येही वेदना होत होती. दुसऱ्या दिवशी त्यांना मुलांच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एक आठवडा त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना घरी सोडण्यात आलं.

स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, लहान मुलांना असं वाटलं होतं की, कोळ्याच्या दंशानंतर त्यांनाही स्पायडर मॅनसारख्या शक्ती मिळतील. पण असं करणं त्यांना चांगलंच महागात पडलं. ज्या कोळ्याचा त्यांनी वापर केला त्या कोळीचं विष सापाच्या विषासारखं असतं.
 

Web Title: Boys let black widow bite them they hopes of turning into spider man api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.