बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 10:40 AM2021-02-25T10:40:34+5:302021-02-25T10:42:23+5:30

employee plotted his own abduction : ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. पण...

Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction, and then ... | बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

googlenewsNext

वॉशिंग्टन - ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. (Office Work) पण अमेरिकेतील अ‍ॅरिझोनामधील कूलिजमध्ये एका १९ वर्षीय कर्मचाऱ्याने सुट्टी घेण्यासाठी जे काही केले त्याबाबत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction)

१९ वर्षीय ब्रेंडन सुल्स याने कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचे कारस्थान रचल्याचे समोर येत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार १९ वर्षांच्या ब्रँडन सूल्स यांनी कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी आपल्याच अपहरणाचे कारस्थान रचल्याची शंका व्यक्त ककण्याच येत आहे. पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार ब्रँडन सूल्स हा एका टायरच्या कारखान्यात काम करत होता. तो एका पाण्याच्या टाकीजवळ दिसून आला. त्याचे हात बांधले गेलेले होते आणि त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. त्याला तिथून जाणाऱ्या एका वाटसरूने पाहिले.

त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचे अपहरण दोन जणांनी केले होते. त्यांनीमला बेशुद्ध केले आणि पाण्याच्या टाकीतून बाहेर पडण्यापूर्वी मला एका वाहनात कोंबले. त्यांनी माझे अपहरण केले होते. कारण माझ्या वडलांनी शहरातील चारी बाजूंना पैसे लपवून ठेवले होते, असा दावा सुल्स याने केला.

मात्र नंतर कुलिजच्या गुप्तहेरांनी केलेल्या तपासामध्ये त्यांना अपहरणाचा कुठलाच पुरावा दिसून आला नाही. सुल्स सांगत असलेल्या कहाणीची पडताळणी करण्यासाठी व्हिडीओ पाहण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सर्व काही खरे नसल्याचे दिसून आले.दरम्यान, सुल्सने अखेरीच पोलिसांसमोर आपण सुट्टी घेण्यासाठी अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. त्यानंतर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेची माहिती देताना सुल्स म्हणाला की, सर्वप्रथम मी माझ्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर बेल्ट उतरवून बेल्टने माझे हात बांधून घेतले. त्यानंतर मी रस्त्याच्या कडेला कुणालाही सहजपणे दिसून येईल, अशा ठिकाणी झोपलो.

Web Title: Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction, and then ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.