​​​​​​​पिकासोच्या पेंटिंगचा तस्करीचा प्रयत्न 'त्याला' पडला महागात, कोर्टाने ठोठावला ४१० कोटी रूपयांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 02:44 PM2020-01-18T14:44:14+5:302020-01-18T14:46:37+5:30

पिकासोच्या या पेंटिंगची किंमत २०५ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातंय.

Billionaire Jaime Botin fined 410 crore rupees for smuggling picasso painting | ​​​​​​​पिकासोच्या पेंटिंगचा तस्करीचा प्रयत्न 'त्याला' पडला महागात, कोर्टाने ठोठावला ४१० कोटी रूपयांचा दंड!

​​​​​​​पिकासोच्या पेंटिंगचा तस्करीचा प्रयत्न 'त्याला' पडला महागात, कोर्टाने ठोठावला ४१० कोटी रूपयांचा दंड!

Next

(Image Credit : nbcnews.com)

स्पेनमधील एका अब्जाधीश कलाप्रेमीला अधिकृत परवानगी न घेता परदेशात पाब्लो पिकासोची पेंटिंगची तस्करी करण्याच्या प्रयत्नासाठी शिक्षा झाली आहे. मॅड्रिड हायकोर्टाने गुरूवारी या व्यक्तीला १८ महिन्यांची तुरूंवासाची शिक्षा आणि ४१० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. या ८३ वर्षीय व्यक्तीचं नाव जॅमी बोटिन असं आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅमीने पिकासोची ही पेंटिंग १९७७ मध्ये खरेदी केली होती. त्यांच्यावर आरोप होता की, ते ही पेंटिंग लंडनमधील एका लिलाव संस्थेला विकण्याच्या तयारीत होता. २०१५ मध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी जॅमीच्या यार्टमधून पेंटिंग ताब्यात घेतली घेतील होती. त्यावेळी हे यार्ट फ्रान्सच्या कोरसिका आयलॅंडवर होतं.

(Image Credit : apollo-magazine.com)

जॅमीवर पेंटिंगची तस्करीची करण्याची केस २०१५ पासून सुरू होती. या पेंटिंगची किंमत साधारण २०५ कोटी रूपये सांगितली जात आहे. सध्या ही पेंटिंग मॅड्रिडच्या रॅना सोफिया म्युझिअममध्ये ठेवण्यात आलीये. स्पेनमध्ये असा नियम आहे की, इथे १०० वर्षांपेक्षा जास्त कोणतीही जुनी वस्तू राष्ट्रीय खजिना घोषित होते. ती वस्तू विकण्याआधी प्रशासनाची आणि वस्तूच्या निर्मात्यांकडून परवानगी घ्यावी लागते. अशी कोणतीही परवानगी जॅमीने घेतलेली नव्हती.

(Image Credit : artnews.com)

जॅमीला याप्रकरणी शिक्षा आणखी जास्त झाली असती, पण त्यांच्या वयामुळे आणि पहिल्यांदाच अशाप्रकारचा गुन्हा केल्याने शिक्षा कमी केली गेली. असं असलं तरी जॅमीने त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते की, ही पिकासोची पेंटिंग त्यांनी स्वित्झर्लॅंडहून खरेदी केली होती. जर ही पेंटिंग परदेशातून खरेदी करण्यात आली तर तस्करीचा काही संबंधच येत नाही.


Web Title: Billionaire Jaime Botin fined 410 crore rupees for smuggling picasso painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.