ऑस्ट्रेलियाची महिला, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:54 PM2021-05-12T19:54:20+5:302021-05-12T19:56:02+5:30

अजब महिलेची गजब कहाणी; मुळची ऑस्ट्रेलियाची, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये

The Australian woman underwent tonsil operation, began speaking in the Irish cent | ऑस्ट्रेलियाची महिला, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये...

ऑस्ट्रेलियाची महिला, तोडांचे ऑप्रेशन केले आणि बोलू लागली आयरीश अ‍ॅसेंटमध्ये...

Next

ऐकावं ते नवलच. अहो खरंच, बोलतोय आम्ही. आता तुम्हीच सांगा जर तोंडाचं ऑप्रेशन झाल्यावर कोणी मराठी भाषा तामीळ भाषेच्या ठेकात बोलू लागलं तर काय म्हणावं? अशीच गत एका ऑस्ट्रेलियन महिलेची झालीयं. या महिलेनं तोंडाच ऑप्रेशन काय केलं ती स्वत:चा मुळ भाषेतील अ‍ॅसेंटमध्ये विसरून गेली आणि चक्क आयरीश अ‍ॅसेंटमध्ये बोलायला लागली. गी मक्येन असं या महिलेचं नाव.

कसं झालं हे?

अहो त्याचं झालं असं की गीचं टॉन्सिल्सचं ऑप्रेशन झालं. काही काळाच्या अवधीनंतर ती चक्क आयरीश अ‍ॅसेंटमध्ये बोलू लागली. आश्चर्य म्हणजे गी कधी आर्यलंडला गेलीही नाही कि कोणत्या आयरिश व्यक्तीला भेटली नाही. तिने तिच पूर्ण आयुष्य ऑस्ट्रेलियातच घालवलं असं तीच म्हणनं आहे. तिनं टिकटॉक या सोशल मिडिया अ‍ॅपवर एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. ज्यात ती म्हणते कि मला स्वप्नातूनच उठल्यासारखं वाटतंय. मला ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंटमध्ये बोलताच येत नाहीये. 
याबाबत ती डॉक्टरांना अनेकदा भेटली. त्यांनी केलेल्या रिसर्चनंतर असं समोर आलंय की ती 'फॉरेन अ‍ॅसेंट सिंड्रोम'ने ग्रासलेली आहे. खरंतर हा सिंड्रोम ब्रेन सर्जरी झालेल्या लोकांना होण्याची शक्यता असते.

जगात आतापर्यंत अशा १०० केसेस
१९०७ सालापर्यंत या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या एकूण १०० केसेसच आतापर्यंत समोर आल्या आहेत. गी ला जेव्हा लक्षात आलं की ती आयरिश अ‍ॅसेंटमध्ये बोलतेय तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर म्हणाले की सध्या ती रिकव्हर होतेय त्यामुळे असं होतंय. तिचा टिकटॉक व्हिडिओ पाहुन सोशल मिडियावरील लोकही अवाक् झाले आहेत.

गी प्रचंड त्रस्त आहे
गी चा विश्वासच बसत नाहीये की तिचा ऑस्ट्रेलियन अ‍ॅसेंट सापडत नाहीये. तिने अनेक डॉक्टरांकडे चकरा मारल्या. पण तिला काहीच समाधान मिळतं नाहीये. ती म्हणाली, ''मी अशा डॉक्टरच्या शोधात आहे जो मला पूर्ण बरं करेल." तिला असा एक डॉक्टर मिळालाही आहे ज्याला, ती लवकर भेटेल.

समाजमाध्यमांवर तर गीच्या या व्हिडिओची खूप चर्चा आहे. कोणी तिला खोटं ठरवतंय तर कोणी तिच्याबद्दल सहानभूती व्यक्त करतंय.

Web Title: The Australian woman underwent tonsil operation, began speaking in the Irish cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.