'इथे' सापडला ५ हजार वर्ष जुना दारूचा अड्डा, राजासाठी तयार केली जात होती इथे दारू...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:17 PM2021-02-15T12:17:06+5:302021-02-15T12:27:52+5:30

इजिप्त(Egypt) मध्ये खोदकाम करताना पुरातत्ववाद्यांनी जमिनीखाली दडलेली ५ हजार वर्ष जुनी दारूची फॅक्टरी (Oldest Beer Factory) शोधून काढली आहे.

Archaeologists have found world's oldest beer factory in Egypt's Abydos | 'इथे' सापडला ५ हजार वर्ष जुना दारूचा अड्डा, राजासाठी तयार केली जात होती इथे दारू...

'इथे' सापडला ५ हजार वर्ष जुना दारूचा अड्डा, राजासाठी तयार केली जात होती इथे दारू...

Next

जगभरात अशा अनेक संस्कृती (Civilisations) आहेत ज्यांनी आपलं वर्चस्व स्थापन केलं आणि रहस्यमयरित्या गायब झाल्या. काहींबाबत आपल्याला बरीच माहिती आहे तर काहींबाबत अजूनही रहस्य कायम आहेत. नुकतंच इजिप्तच्या (Egypt) पुरातत्व विभागाला (Archaeologists) खोदकाम करताना एक अशी बीअर फॅक्टरी मिळाली आहे, जी जगातली सर्वात जुनी बीअर फॅक्टरी (World's Oldest Beer Factory)  मानली जात आहे. 

इजिप्त(Egypt) मध्ये खोदकाम करताना पुरातत्ववाद्यांनी जमिनीखाली दडलेली ५ हजार वर्ष जुनी दारूची फॅक्टरी (Oldest Beer Factory) शोधून काढली आहे. हा दारूचा अड्डा इजिप्तच्या एबिडॉस (Abydos) नावाच्या शहरात सापडला आहे. ही जगातली सर्वात जुनी बीअर फॅक्टरी असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या अंदाज लावले जात आहे की, या फॅक्टरीमध्ये राज परिवारासाठी दारू (Alcohol) तयार केली जात असावी. (हे पण वाचा : रहस्यमय! इजिप्तमध्ये सापडली सोन्याची जीभ असलेली ममी, जाणून घ्या सोन्याची जीभ असण्याचं कारण....)

मडक्यांमध्ये तयार केली जात होती दारू

दारूचा हा अड्डा इजिप्तच्या सोहाग गवर्नोरेटजवळ सापडला आहे. टूरिज्म आणि एन्टीक मिनिस्ट्रीने सांगितले की, ही साइट ३१०० बीसी दरम्यानही असू शकते. येथील खोदकाम डॉ. मॅथ्यू एडम्स यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं. त्यांच्यानुसार, इथे इजिप्तमधील राजांसाठी बीअर बनवली जात असावी.

या अड्ड्यावर २२ हजार ४०० लिटर दारू बनवली जात असेल. सर्वात खास बाब म्हणजे या साइटमध्ये मातीचे ३२० मडकी सापडली आहेत. असे मानले जात आहे की, दारू याच मडक्यांमध्ये तयार केली जात असेल.

धान्य सडवून दारू

हा दारूचा अड्डा नरमेर राजाच्या काळातील असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी ५ हजार वर्षांआधी इजिप्तवर राज्य केलं होतं. त्यांचा महाल या साइटच्या जवळच होता. दारूचा हा अड्डा मोठ्या भागात पसरलेला आहे. यात ८ सेक्शन्स होते. प्रत्येक सेक्शनमध्ये ४० मातीची मडकी सापडली आहेत. ज्यात धान्य आणि पाणी मिश्रित करून गरम करून सडवलं जात होतं. नंतर ते गाळून त्यापासून बीअर तयार केली जात असेल.
 

Web Title: Archaeologists have found world's oldest beer factory in Egypt's Abydos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.