मुलाच्या परीक्षेसाठी बापाने १०५ किमी अंतर सायकलने केलं पार, आनंद महिंद्रांनी दिलं खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:14 AM2020-08-24T09:14:26+5:302020-08-24T12:38:23+5:30

आता दिलदार उद्योगपती अशी ओळख असलेले आनंद महिंद्रा यांनी शोभाराम यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावरून आनंद मंहिद्रा यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

Anand Mahindra steps in to help M laborer who cycles 105 km for his son exam | मुलाच्या परीक्षेसाठी बापाने १०५ किमी अंतर सायकलने केलं पार, आनंद महिंद्रांनी दिलं खास गिफ्ट!

मुलाच्या परीक्षेसाठी बापाने १०५ किमी अंतर सायकलने केलं पार, आनंद महिंद्रांनी दिलं खास गिफ्ट!

Next

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच वेगवेगळे प्रेरणादायी किंवा जगण्याची जिद्द दाखवणारे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. वेगळ्या प्रयोग करणाऱ्या लोकांना मदत करत असतात. आता त्यांनी एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. या गोष्टीला कारणीभूत ठरली या मुलाच्या पित्याी हिंमत आणि मेहनत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यातील मजुरी करणारे शोभाराम यांनी त्यांचा मुलगा आशिष याला १०वी च्या परिक्षेसाठी १०५ किलोमीटरचा सायकल प्रवास केला होता. त्यांचा फोटो व्हायरलही झाला आणि लोकांनी त्यांच्या हिंमतीचं कौतुकही केलं होतं. आता दिलदार उद्योगपती अशी ओळख असलेले आनंद महिंद्रा यांनी शोभाराम यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावरून आनंद मंहिद्रा यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

गुरूवारी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक स्टोरी शेअर केली आणि लिहिले की, 'या पित्याला सलाम! जे आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याचं स्वप्न बघतात. याच स्वप्नाने देश पुढे जात असतो. आमची संस्था आशिषच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च उचलेल'. यासाठी महिंद्रा यांनी एका पत्रकाराला या परिवारासोबत संपर्क करण्याची विनंती केली होती. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि साधारण ५ हजारपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

मध्य प्रदेश बोर्डाने १०वी आणि १२वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा आयोजित केली होती. 'रूक जाना नही' असं या अभियानाला नाव देण्यात आलं होतं. या अंतर्गत आशिषला तीन विषयांची परिक्षा द्यायची होती. पण त्याचं परिक्षा केंद्र घरापासून १०५ किमोमीटर दूर होतं. कोरोनामुळे बसेस बंद होत्या. अशात परीक्षेला पोहोचण्यासाठी त्याच्या वडिलांनी ७ तास सायकल चालवली आणि परीक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी शाळेत पोहोचायचं होतं. आशिषला खूप शिकून अधिकारी व्हायचं आहे. आता आनंद महिंद्रा यांच्या मदतीने नक्कीच आशिषचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा करूया.

हे पण वाचा :

अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

Web Title: Anand Mahindra steps in to help M laborer who cycles 105 km for his son exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.