अमेरिकेतील मॉडल आणि अभिनेत्री शांटेल ग्याकेलोनचा पीनट बटर बिस्किट खाल्ल्यावर ब्रेन डॅमेज झाला होता. आता लास वेगासच्या कोर्टाने तिचा मेडिकल खर्च आणि मानसिक-भावनिक समस्यांचा विचार करता तिच्या परिवाराला २९.५ मिलियन डॉलर म्हणजे २२२ कोटी रूपये देण्याचा आदेश दिला आहे. २०१३ मध्ये शांटेल लास वेगासमध्ये मॅजिक फॅशन ट्रेड शोमध्ये मॉडलिंग करत होती. यावेळी तिची मैत्रीण ताराने तिला दहीसारखी टेस्ट असणारं यॉगर्ट आणि प्रेट्जेल दिलं होतं. प्रेट्जेल एकप्रकाचं बिस्कीट असतं आणि या बिस्कीटात पीनट बटरही होतं.

शांटेलला पीनट बटरची एलर्जी होती. पण तिला हे माहीत नव्हतं की, त्या बिस्किटात पीनट बटर आहे. तिच्या मैत्रीणीलाही हे माहीत नव्हतं की, शांटेलला पीनट बटरची एलर्जी आहे. शांटेल हे खाल्ल्यानंतर एनाफायलेक्टिक शॉकमध्ये गेली होती. एनाफायलेक्टिक शॉकची स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्तीला एलर्जीचं रिअॅक्शन होतं. यावर वेळीच उपचार केले गेले नाही तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. 

या शॉकच्या स्थितीत epinephrine नावाचं औषध दिलं जातं. हे औषध वेळीच दिलं गेलं नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. शांटेलचे वकिल म्हणाले की जेव्हा ती हॉस्पिटमध्ये गेली तेव्हा तिला औषध दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे तिची तब्येत आणखी जास्त बिघडली. 

यावेळी शांटेलचं वय २७ वर्षे होतें आणि ती ते बिस्किट खाऊन शॉकमध्ये गेली होती. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. पण हॉस्पिटलमध्ये तिची तब्येत जास्त बिघडली. शांटेलचे वकिल क्रिस मॉरिस म्हणाले होते की, मेडिकवेस्ट नावाच्या हॉस्पिटलमधील ट्रिटमेंटनंतर शांटेलचा मेंदू काही मिनिटांसाठी बंद पडला होता. 

शांटेलला आता ही रक्कम मिळण्याचं मुख्य कारण हे आहे की, तिला योग्य वेळेवर पॅरामेडिक्स योग्य उपचार देऊ शकले नव्हते. मॉडलचे वकिल म्हणाले की, एलर्जीच्या रिअॅक्शनमुळे तिला epinephrine ची गरज होती. पण तिला ते औषध दिलंच गेलं नव्हतं. आता शांटेल ३५ वर्षाची झाली असून अजूनही बरी झालेली नाही. तिला आताही लकवा मारलेला आहे. ती २४ तास आपल्या परिवाराच्या देखरेखीखाली राहते. ती केवळ एक आय गेज कॉम्प्युटरच्या आधारे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कम्युनिकेट करते.

गेल्या आठ वर्षांपासून शांटेल आई-वडिलांच्या डायनिंग रूममध्ये राहते. रिपोर्टनुसार, ती यूट्यूब व्हिडिओ बघून गाणं गाण्याचा प्रयत्न करते. आणि फेसच्या एक्सप्रेशनच्या मदतीने डान्स करण्याचा प्रयत्न करते. मॉडलची फॅमिली मोठ्या संघर्षानंतर आलेल्या या निर्णयाने संतुष्ट आहे. या पैशातून ते आता मुलीची व्यवस्थित काळजी घेऊ शकतील.
 

Web Title: An American model got allergy after peanut butter pretzel and now she will get thirty million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.