१९ वर्षीय तरुणी ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं 'हे' धक्कादायक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 02:28 PM2021-09-19T14:28:30+5:302021-09-19T15:27:54+5:30

अमेरिकेतील एका १९ वर्षीय मुलीनं ६१ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. पण कुटुंबीयांना जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा कुटुंबीयांनी असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. खरंतर या ६१ वर्षाच्या तिच्या प्रियकराला आधीपासूनच १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती.

america 19 year old girl fell in love with 61 year old man | १९ वर्षीय तरुणी ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं 'हे' धक्कादायक पाऊल

१९ वर्षीय तरुणी ६१ वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात, घरच्यांला समजताच त्यांनी उचललं 'हे' धक्कादायक पाऊल

Next

अमेरिकेतील एका १९ वर्षीय मुलीनं ६१ वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. पण कुटुंबीयांना जेव्हा तिने हे सांगितले तेव्हा कुटुंबीयांनी असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. खरंतर या ६१ वर्षाच्या तिच्या प्रियकराला आधीपासूनच १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलं आहे आणि तरुणीला याबाबत माहितीही होती.

अमेरिकेतील १९ वर्षीय ऑड्रे चेयने आणि ६१ वर्षीय केविन स्माईल मूनवर ऑनलाईन चॅट (Online Chat) केल्यानंतर काही महिन्यांतच दोघं एकमेकांना भेटले. ऑड्रेनं सांगितलं, की त्याला पाहून मी उत्सुकही होते आणि घाबरलेही होते. पहिल्या भेटीतच केविननं पुढाकार घेतला आणि आपला हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला. ही आमची पहिलीच समोरासमोर झालेली भेट होती. आम्हाला या पहिल्याच नजरेत एकमेकांवर प्रेम झालं होतं. ऑड्रे सैन्य दलात आहे.

ऑड्रेनं म्हटलं, की आम्ही सुरुवातीला सैन्याबाबतच बातचीत केली. नंतर त्यानं मला माझ्याबद्दल काही प्रश्न विचारले आणि आम्ही एकमेकांसोबत बरंच काही शेअर केलं. आम्ही बऱ्याच गोष्टींवर बातचीत केली. ऑड्रेनं म्हटलं, की मला केविन खूप आवडायचे. अजूनही आमचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम वाढतंच आहे. हेच आमच्या नात्याला अधिक खास बनवतं. ऑड्रेला भेटण्याआधी केविनच्या लग्नाला १९ वर्ष झालेले होते आणि त्यांना १६ तसंच २३ वर्षाची दोन मुलंही आहेत.
तरुणीनं सांगितलं, की

आधी तिच्या कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केला होता. ऑड्रेनं सांगितलं, की जेव्ही ती पहिल्यांदाच प्रियकराला (Boyfriend) आपल्या कुटुंबीयांना भेटवण्यासाठी घरी गेली तेव्हा कुटुंबीयांनी थेट पोलिसांनाच (Police) बोलावलं.  मात्र आता हे नातं जुळल्यानंतर कुटुंबीयांनीही त्यांचं स्वागत केलं. वयात ४२ वर्षाचं अंतर असूनही हे जोडपं एकमेकांवर जीवापड प्रेम करतं.

Web Title: america 19 year old girl fell in love with 61 year old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app