आली लहर केला कहर! सुनावणीवेळी आरोपी जजसोबत करू लागला फ्लर्ट, मिळालं जबरदस्त उत्तर.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 12:49 PM2021-02-09T12:49:09+5:302021-02-09T12:49:41+5:30

एका व्यक्तीने कोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान जे केलं त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तुम्ही कधी कुणी असंही करू शकतं याचाही विचार केला नसेल.

Accused flirting with court judge during hearing video goes viral on internet | आली लहर केला कहर! सुनावणीवेळी आरोपी जजसोबत करू लागला फ्लर्ट, मिळालं जबरदस्त उत्तर.....

आली लहर केला कहर! सुनावणीवेळी आरोपी जजसोबत करू लागला फ्लर्ट, मिळालं जबरदस्त उत्तर.....

Next

जगातले काही लोक अशी कामं करतात की, ज्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. आपण विचारात पडतो की, या व्यक्ती इतकी हिंमत आली कुठून? सोशल मीडियावर अशाच एका घटनेची चर्चा रंगली आहे. ही घटना आहे फ्लोरिडाची (Florida). इथे एका व्यक्तीने कोर्टाच्या (Court) ऑनलाइन सुनावणीदरम्यान जे केलं त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तुम्ही कधी कुणी असंही करू शकतं याचाही विचार केला नसेल.

ही घटना थोडी नाही तर पूर्णच विचित्र आहे. झालं असं की, एका व्यक्ती एका प्रकरणाबाबत ऑनलाइन सुनावणी सुरू होती. आरोपीचं नाव डेमेट्रिअस लुईस असं आहे. एका रिपोर्टनुसार, लुईस ४ फेब्रुवारीला झूम कॉलवरून ब्रोवार्ड काउंटीच्या न्यायाधीश तबिता ब्लॅकमनसमोर हजर झाला होता. 

जजसोबत फ्लर्ट...

आरोपी आधी म्हणाला की, 'तुम्ही कशा आहात? त्या म्हणाल्या की, मी ठीक आहे. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांना निरखून पाहिल्यावर लुईस म्हणाला की, 'जज, तुम्ही फार सुंदर आहात. तो इतक्यावरच थांबला नाही. तो पुढे म्हणाला की, माझं तुमच्यावर प्रेम आहे. जज लुईसच्या या बोलण्याने हैराण झाल्या.

जज काय म्हणाल्या?

आरोपीच्या या वागण्यावर जज म्हणाल्या की चापलूशी दुसरीकडे कुठेही चालू शकते. पण कोर्टात ती शक्य नाही. लुईसला कथितपणे २०१९ मध्ये सोडण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला शस्त्रास्त्रांसाठी आणि इतर गुन्ह्यासाठी शिक्षा देण्यात आली होती. ब्लॅकमन यांना गेल्यावर्षी फ्लोरिडाच्या सेवेंथ जुडिशिअल सर्किट काउंटीमध्ये गॉन रॉन डेसेंटिस द्वारे नियुक्त करण्यात आलं होतं.
 

Web Title: Accused flirting with court judge during hearing video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.