हाताच्या अंगठ्यांच्या ३ पोजिशन सांगतात तुमचे 'ते' सीक्रेट्स, जे तुम्हालाही माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:44 PM2019-12-12T12:44:38+5:302019-12-12T12:44:43+5:30

अंगठ्यांच्या हालचाली कशाप्रकारे करता, यावरून तुमचे सीक्रेट होतात उघड...

3 way you cross your thumb shows what kind of person you are | हाताच्या अंगठ्यांच्या ३ पोजिशन सांगतात तुमचे 'ते' सीक्रेट्स, जे तुम्हालाही माहीत नसतील!

हाताच्या अंगठ्यांच्या ३ पोजिशन सांगतात तुमचे 'ते' सीक्रेट्स, जे तुम्हालाही माहीत नसतील!

Next

आपली बॉडी लॅंग्वेज आपल्या व्यक्तिमत्वाबाबत खूप काही सांगते हे तुम्हाला चांगलंच माहीत असेलच. बॉडी लॅंग्वेजचे तज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते Roger Wolcott Sperry यांचं मत आहे की, तुम्ही दोन्ही हातांची बोटे कशाप्रकारे एकत्र आणता, यावरूनही तुमच्याबाबत खूप काही सांगता येतं. त्यांनी रिसर्चमधून हे सिद्ध केलं आहे की, मेंदू दोन भागांमध्ये विभागलेला आहे. व्यक्तीचा व्यवहार या गोष्टीवर अवलंबून आहे की, मेंदूचा कोणता भाग जास्त सक्रीय आहे.

१) दोन अंगठे एकत्र

(Image Credit : lajmi.net)

अशाप्रकारचे लोक दुसऱ्यांचं खोटं पकडण्यात पटाईत असतात. त्यांना दुसऱ्यांमध्येही आपल्यासारखं डेडिकेशन आणि परफेक्शन हवं असतं. याचा अर्थ हा होत नाही की, तुम्ही इतरांच्या गरजा आणि परिस्थितींबाबत विचार करत नाही. तुम्ही नेहमी दुसऱ्याची मते जाणून घेता आणि निर्णय घेण्याआधी त्यांच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करता. तुमची स्पष्टता, इमानदारी कधी-कधी काही लोकांच्या तुमच्या विषयी नकारात्मक मत होण्याचं कारण ठरते. पण तुमचा हाच गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा करतो. सोबतच तुम्ही नात्यांमध्येही इमानदारीला महत्व देता आणि तुम्ही कधीही तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास घाबरत नाही. 

२) डावा अंगठा वर असल्यास

(Image Credit : lajmi.net)

जर तुमचा डावा अंगठा वर असेल तर तुम्ही फार प्रॅक्टिकल व्यक्ती आहात. असे लोक कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी दोन्ही बाजूंचा विचार करतात. अशा लोकांना दगा देणंही कठीण असतं. त्यामुळे असे लोक परिवार आणि मित्रांमध्ये लोकप्रिय असतात. अशा लोकांचा सल्ला पूर्णपणे विचार करून देतात. महत्त्वाची बाब म्हणजे असे लोक रोमॅंटिकही असतात.

३) उजवा अंगठा वर असेल तर

(Image Credit : lajmi.net)

तुम्हाला जर तुमची बोटे दाबत आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याला डावीकडे ठेवणं पसंत असेल तरत तुम्ही फार इमोशनल व्यक्ती आहात. तुम्ही हे समजून घेण्यात सक्षम आहात की, जेव्हा लोक त्यांच्या वास्तविक भावना लपवतात, तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटू शकतं? त्यामुळे अशा लोकांसोबत दुसरे लोक लवकर जुळतात. असे लोक कोणतंही काम आऊट ऑफ द बॉक्स करण्याची हिंमत ठेवतात.


Web Title: 3 way you cross your thumb shows what kind of person you are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.