पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी युवकाची सायकलवरुन देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 10:20 PM2019-11-25T22:20:11+5:302019-11-25T22:20:27+5:30

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी ...

 Youth's patriotism for the sake of environmental awareness | पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी युवकाची सायकलवरुन देशभ्रमंती

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी युवकाची सायकलवरुन देशभ्रमंती

googlenewsNext

जळगाव : विकासकामांसाठी झाडे तोडण्यात येत असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानाचे प्रमाण वाढत असून, जंगलातील प्राणी मानवीवस्तीत येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मानवावर परिणाम होणार असून, आतापासून प्रत्येकाने झाडे लावावीत आणि झाडे जगवावीत. हा संदेश देण्यासाठी राजस्थानातील उच्चशिक्षित युवकाने सायकलवरुन देशभ्रमंती सुरु केली आहे. जम्मू काश्मीर पासून देशभ्रमंतीला सुरुवात केली असून, आतापर्यंत १२ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.
नरपत सिंहज राजपुरोहित असे या युवकाचे नाव असून, रविवारी सायंकाळी देशभ्रमंती करत चोपड्याहून जळगावात दाखल झाले होते. नरपत यांचे राजस्थानातील ढाणी जिल्ह्यातील लंगेरा हे गाव असून, त्यांनी इयत्ता १२वीनंतर दोन वर्षांचे तांत्रिक शिक्षण घेतले आहे. लहानपासूनच झाडे लावून, ती जगविण्याचा छंद असल्यामुळे, इतरानींही झाडे लावून, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन नरपत हे करत आहेत.
या देशभ्रंतीच्या यात्रेला त्यांनी जम्मू विमानतळावरुन २७ जानेवारी २०१९ला सुरुवात केली आहे. या ठिकाणाहून त्यांनी काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, युपी, उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. रविवारी चोपडा येथून, सायंकाळी जळगावात आले होते.
नरतप यांनी सांगितले की, सायकल भ्रमंती करतांना एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगत असल्याचे सांगितले. दररोज दीडशे किलोमीटरचा प्रवास करित असून, वाटेत कुठेही साधे जेवण घेतो. सायकल रस्त्यात कुठे पंक्चर झाल्यास, पंक्चर काढण्याचे साहित्य, पाण्याची बाटली व रात्री निवाऱ्यासाठी अंथरुण ऐवढीच शिदोरी आपल्यासोबत असल्याचे नरपत यांनी सांगितले.

Web Title:  Youth's patriotism for the sake of environmental awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.