पत्नी पळाली, दलालीचे १ लाखही बुडाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:47 PM2020-09-07T21:47:05+5:302020-09-07T21:47:43+5:30

दलालाकडून फसवणूक

Young man commits suicide by drowning his wife | पत्नी पळाली, दलालीचे १ लाखही बुडाल्याने तरुणाची आत्महत्या

पत्नी पळाली, दलालीचे १ लाखही बुडाल्याने तरुणाची आत्महत्या

Next

जळगाव : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली. लग्न जोडण्यासाठी महिला दलालांनी घेतलेले एक लाख रुपयेही परत मिळत नसल्याच्या संतापात कैलास संतोष चवरे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणात दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा.शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव (३७, हॅपी होम कॉलनी) या दोघांना शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ७ आॅगस्ट रोजी कैलास याचा मृत्यू झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कैलास या तरुणाचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. चार वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. समाजात मुलींची कमतरता असल्याने मुली मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मेहुणा संतोष रघुनाथ पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे कुसुंबा येथे राहणाºया कल्पनाबाई यांच्यामार्फत शनी पेठेतील लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी यांच्याकडे गेले. लिलाबाई हिने विवाह संबंध जोडणारी उज्ज्वला उर्फ संगीता ही मलकापूरला माझी ओळखीची असून तिच्याकडे मुली असल्याचे सांगितले.
त्यानुसार कैलास, त्याचा मेहुणा संतोष व इतर नातेवाईक मलकापूर येथे मुलगी पाहण्यासाठी गेले. तेथे मुलगी पसंत पडली, मात्र नंतर मुलाचे दुसरे लग्न असल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे या दलाल महिलेने दुसरी मुलगी दाखविली, परंतु त्यासाठी १ लाख रुपये लागतील म्हणून सांगितले. मुलगी पसंत झाल्यानंतर जागेवरच ४० हजार रुपये देण्यात आले व त्याच दिवशी तेथे एकमेकाच्या गळ्यात माळ टाकून कैलास व मुलीचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर सर्वजण घरी आले असता कुसंबा येथे लिलाबाई जोशी हिला ६० हजार रुपये देण्यात आले. ३० जुलै २०२० रोजी विवाह व पैशाचा व्यवहार झाला.
खोट्या नावाचा वापर
लग्न लावून देण्याच्या प्रकरणांमध्ये दलालांकडून खोट्या नावाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संगीता भालेराव हिने पद्मा सुधाकर खिल्लारे, संगीता रोहीदास भालेराव, संगीता रमेश पाटील, व संगीता संतोष पाटील अशा नावांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात नववधू व लिलाबाई जोशी या दोघांना अटक झालेली नाही.
दुसºया दिवशी मोबाईल घेऊन पलायन
दुसºया दिवशी ३१ रोजी ११.३० वाजता नववधू कैलासचा मोबाईल घेऊन घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे कैलास व संतोष असे दोघंजण १ आॅगस्ट रोजी लिलाबाई हिच्याकडे गेले. मुलगी पळून गेली, त्यामुळे आमचे एक लाख रुपये परत कर, अशी मागणी त्यांनी केली असता लिलाबाई हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर पैसे दिले नाही तर मी जीवाचे बरे वाईट करुन घेईल, अशी धमकी कैलास याने दिली. परंतु तरीही लिलाबाई हिने पैसे परत केले नाहीत. ३ रोजी कैलास याने ‘पत्नी पळाली, १ लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने कैलास याला दवाखान्यात दाखल केले. तेथे ७ आॅगस्ट रोजी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
दरम्यान, या घटनेनंतर संताष रघुनाथ पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून नववधू, दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा. शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, संगीता हिला रविवारी पोलिसांनी अटक केली. सोमवारी दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी हिला अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघींचीही कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे व धनंजय येवले करीत आहेत.

 

Web Title: Young man commits suicide by drowning his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव