पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:02 PM2020-04-05T18:02:01+5:302020-04-05T18:02:54+5:30

मुंदाणे प्र. अ. येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Young girl commits suicide at Mundane in Parola taluka | पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे तरुणाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देघरातच साडीच्या साहाय्याने घेतला गळफासआत्महत्येचे कारण अज्ञात

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील मुंदाणे प्र. अ. येथील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ रोजी सकाळी नऊला घडली. निखिल संजय संदानशिव असे त्याचे नाव आहे.
निखिलने त्याच्या राहत्या घरात पंख्याच्या कडीला साडी बांधून गळफास घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यास खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले. याबाबत मयत निखिलचे काका आबा जगन्नाथ संदानशिव रा.मुंदाणे यांनी पारोळा पोलिसात खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील करीत आहेत.

Web Title: Young girl commits suicide at Mundane in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.