चोपडा सूतगिरणीतील सूत दोन वर्षांनंतर विदेशात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 09:47 PM2021-06-10T21:47:43+5:302021-06-10T21:48:26+5:30

शेतकरी सहकारी सुतगिरणीने आज दोन वर्षांच्या अंतरानंतर आपले उच्च प्रतीचे सूत परदेशात रवाना करण्यासाठी आज पहिल्या ट्रॅालीचे पूजन करण्यात आले. 

The yarn from the Chopda spinning mill went abroad after two years | चोपडा सूतगिरणीतील सूत दोन वर्षांनंतर विदेशात रवाना

चोपडा सूतगिरणीतील सूत दोन वर्षांनंतर विदेशात रवाना

googlenewsNext
ठळक मुद्दे उच्चप्रतीचे सूत परदेशात रवाना होणार.

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा  :   चोपडा तालुका शेतकरी सहकारी सुतगिरणीने आज दोन वर्षांच्या अंतरानंतर आपले उच्च प्रतीचे सूत परदेशात रवाना करण्यासाठी आज पहिल्या ट्रॅालीचे पूजन  चेअरमन व  माजी आमदार कैलास पाटील व संचालकांच्या हस्ते करण्यात आले. 

चोपडा सूतगिरणीने २०१८/१९ मध्ये तयार झालेल्या सूताची चीन व इतर परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली होती. त्यामुळे 'चोपडा सूत' म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा गिरणीने निर्माण केला होता. परंतु भारत व चीन मधील तणावाची स्थिती  तसेच कोविडच्या संसर्गामुळे निर्यातीवर बंदी  होती. 

शासनाने निर्णय बदलल्यानंतर ९ जून रोजी चीनसाठी सूतगिरणीच्या कार्यस्थळावरुन वीस टन सूताचा पहिला ट्रॅाला रवाना करण्यात आला. ट्रॅालीचे पूजन संचालिका रंजना नेवे व माजी संचालक श्रीकांत नेवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील,संचालक तुकाराम पाटील  जनरल मॅनेजर विजय पाटील, अधिकारी रतन पाटील, गुलाबराव मराठे, महेश उपाध्याय यांच्यासह कर्मचारी व कामगार उपस्थित होते. 
 

Web Title: The yarn from the Chopda spinning mill went abroad after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.