शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 04:52 PM2021-03-02T16:52:46+5:302021-03-02T16:53:57+5:30

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा घेण्यात आली.

Workshop at Muktainagar to stream out-of-school students | शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी मुक्ताईनगर येथे कार्यशाळा

Next
ref='https://www.lokmat.com/topics/muktainagar/'>मुक्ताईनगर : तहसीलदार श्वेता संचेती यांच्या अध्यक्षतेखाली उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या उपस्थितीत सर्व केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षक प्रतिनिधी यांच्यासोबत मुक्ताईनगर येथे कार्यशाळा घेण्यात आली. कोणताही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही आणि शाळेत दाखल असलेला विद्यार्थी हा शाळेमध्ये अनियमित होणार नाही याबाबत तहसीलदारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कार्यशाळेबाबत तालुक्यात नियोजन केले. सर्वेक्षणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडा, असे आवाहन केले.त्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात केली. सर्वेक्षणावेळी तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका व समिती सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेस पंचायत समितीचे कार्यालय अधीक्षक बी.डी.महाजन, बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाच्या पर्यवेक्षिका बी.के.तायडे, जे.ई.स्कूलचे प्राचार्य आर.पी.पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक महेंद्र मालवेकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Workshop at Muktainagar to stream out-of-school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.