Workplace Bucket | कामाच्याचं ठिकाणी कामगाराचा डल्ला
कामाच्याचं ठिकाणी कामगाराचा डल्ला

जळगाव- स्वत: काम करीत असलेल्या राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळील फुडप्रोडक्ट मनिनरी दुकानातचं डल्ला मारणाऱ्या कामगाराच्या मुसक्या आवळण्यास एलसीबी पथकाला यश आले आहे़ हरिष मुकूंदा पवार (वय-३५, रा़ एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे़ दरम्यान, दुकानात पाच वेळा डल्ला मारीत सुमारे दीड लाखाचा ऐवज संशयिताने लांबविल्याचे निषन्न झाले आहे.

शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस सब्बीरभाई भावनगरवाला यांचे फ्रुटस् अ‍ॅण्ड जनरल प्रोडक्टचे हॉलसेल दुकान आहे़ दरम्यान, या दुकानाच्या खिडक््याच्या रिल कापून अज्ञात चोरट्याने ७ नोव्हेंबरला ३६ हजार ५०० रूपये चोरून नेले होते़ त्यानंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २१ नोव्हेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, या दुकानात आधीही दोन ते तीन वेळेस चोºया झाल्यामुळे पोलिसांना कामगारांवर संशय बळावला होता़ अन् हा संशय खरा ठरत एलसीबीचे विजयसिंग पाटील यांना दुकानातील कामगार हरिष मुकूंदा पवार याने चोरी केली असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी एलसीबीचे पोलीस निरिखक बापूसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, शरद भालेराव यांनी सापळा रचून हरिष पवार यास अटक केली़

Web Title: Workplace Bucket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.