Women's resolutions to water the village Rotwadla | रोटवदला गाव पाणीदार करण्याचा महिलांचा संकल्प

रोटवदला गाव पाणीदार करण्याचा महिलांचा संकल्प

जामनेर - रोटवद, ता.जामनेर येथे जागतिक महिला दिनी पाणी फाउंडेशन टिमच्यावतीने महिला मेळावा घेण्यात आला. गावात पहिल्यांदाच महिला मेळावा झाल्याने सर्व महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यासाठी सोशल ट्रेनर सुवर्णा शिंदे यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेविषयी माहिती दिली. तसेच गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान आणि एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. सुवर्णा शिंदे यांनी दोन तास सर्व महिलांना पाणी व मानवी जीवन आणि महिला शक्ती यांचे महत्व उदाहरणासह पटवून दिले. या महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एरंडोल येथे ५१ महिलांची आरोग्य तपासणी
एरंडोल - एरंडोल नगरपालिकेतर्फे नागरी उपजिविका अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने नगरपालिका सभागृहात महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमेश परदेशी होते. प्रमुख वक्ते वैशाली विसपुते यांनी आरोग्य बाबत महिलांना मार्गदर्शन केले. महिला व बालकल्याण सभापती जयश्री पाटील यांचेही भाषण झाले. रमेश परदेशी, योगेश महाजन अ‍ॅड नितिन महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासन अधिकारी संजय धमाल उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कुसुम पाटील यांनी केले तर वैशाली पाटील यांनी आभार मानले. आरोग्य तपासणी शिबिरात ५१ महिलांची तपासणी करण्यात आली.

Web Title: Women's resolutions to water the village Rotwadla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.