भुसावळच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालली महिला जळगावला सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:04 PM2020-07-01T18:04:53+5:302020-07-01T18:05:47+5:30

भुसावळ : येथील महामार्गावरील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला ३० रोजी सकाळी ...

A woman who went missing from Bhusawal's Kovid Center was found in Jalgaon | भुसावळच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालली महिला जळगावला सापडली

भुसावळच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालली महिला जळगावला सापडली

Next
ठळक मुद्देमहिला आढळला जळगावच्या राजकमल टॉकीज चौकातहोमगार्ड मुलगा व त्याच्या मित्रांना आढळली बेपत्ता महिला

भुसावळ : येथील महामार्गावरील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला ३० रोजी सकाळी बेपत्ता झाली होती. १ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता बेपत्ता झालेली महिला जळगाव येथील राजकमल चौकात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास होमगार्ड मुलगा भगीरथ सोनवणे व त्याच्या मित्रास दिसून आली.
वृद्ध महिला हरवल्याची नोंद भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री करण्यात आली होती. या आधी जळगाव येथील कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह काही दिवसांनंतर रुग्णालयातील शौचालयात आढळला होता. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. वृद्ध महिला सापडल्याने कुटुंबियांना जरी दिलासा मिळाला असला तरी आरोग्य यंत्रणेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिलेचा स्वॅब घेण्यात आला असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या महिला जळगाव येथील कोविड सेंटरमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपस्थित झालेले प्रश्न
वयोवृद्ध मानसिक रुग्ण असलेली महिला जळगाव ते भुसावळ गेली कशी?
कोविड सेंटरमधून जात असताना महिलेस कोणी पाहिले नाही का?
शोध घेतल्यानंतर कुटुंबियांना महिला सापडली तर आरोग्य विभाग यंत्रणेला व पोलीस प्रशासनाने महिलांचा शोध घेतला का?
यापूर्वी अशा घटना अशा घटना घडलेल्या आहेत का?
महिलेचे काही बरेवाईट झाले असते तर याला जबाबदार कोण?
असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

Web Title: A woman who went missing from Bhusawal's Kovid Center was found in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.