भाजीपाला घ्यायला गेलेले परत घरी आलेच नाही, दोन भावंडासह पत्नी अपघातात ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 07:49 PM2020-10-14T19:49:15+5:302020-10-14T19:49:42+5:30

Road Accident : बाजार समीतीसमोर विचीत्र अपघात : मालवाहू वाहनाने मागून दुचाकीला दीली धडक

Wife killed in road mishap with two siblings in jalgaon | भाजीपाला घ्यायला गेलेले परत घरी आलेच नाही, दोन भावंडासह पत्नी अपघातात ठार

भाजीपाला घ्यायला गेलेले परत घरी आलेच नाही, दोन भावंडासह पत्नी अपघातात ठार

googlenewsNext
ठळक मुद्देमागून धडक दिल्याने दुचाकी पुढे चालणाऱ्या मालवाहू वाहनावर धडकली होती.

जळगाव : एकाच दुचाकीने बाजार समीतीत भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या श्यामलाल शहादूलाल केवट (वय ४०) त्यांची पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट (वय ३८) व भाऊ दीपक शहादूलालकेवट (३५) सर्व रा. कैथा ता. अमिलिहा, रिवा , मध्यप्रदेश ह.मु. सिंधी कॉलनी या तीघांच्या दुचाकीला मागून आलेल्या मालवाहू वाहनाने धडक दील्याने ते पती-पत्नी जागीच ठार झाले तर भाऊ दीपक याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पहाटे पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समीतीसमोर झाला. मागून धडक दिल्याने दुचाकी पुढे चालणाऱ्या मालवाहू वाहनावर धडकली होती.

सूत्रांनी दीलेली माहीती अशी की, श्यामलाल शहादूलाल केवट हे  पत्नीसह दोन मुली व मुलगा यांच्यासह सिंधी कॉलनीत वास्तव्याला होते. श्यामलाल हे महेंद्र मकरेजा यांच्या जीत बेकरी मध्ये गेल्या १५ वर्षांपासून कामाला होते तर पत्नी नेवस्वा या भाजीपाला विक्री करुन कुटुंबाला हातभार लावायच्या. श्यामलाल यांचे भाऊ दीपक केवट हे देखील भाजीपाला विक्री करण्याचे काम करायचे. भाजीपाला घेण्यासाठी ते दररोज  कृषी उत्पन्न बाजार समितीत जायचे. बुधवारी सकाळी ४.३० वाजता श्यामलाल केवट हे पत्नी नेवस्वा आणि भाऊ दीपक सोबत दुचाकीने (क्र.एमएच १९ एडब्ल्यू ७९६२) ने भाजीपाला घेण्यासाठी निघाले असता पाच वाजता औद्योगीक वसाहतीच्या दिशेने जात असतांना पलीकडून येणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली. याचवेळी या वाहनाच्या पाठीमागे दुसरे वाहन येत होते. अपघातग्रस्त वाहनाचे अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकी चालक श्यामलाल केवट व त्याच्या मागे बसलेली पत्नी नेवस्वा केवट हे दोघे जागीच ठार झाले. तर भाऊ दीपक केवट हे गंभीर जखमी झाले. दीपक यांना तातडीन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहीती मीळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे कर्मचारी शीवदास चौधरी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी -पत्नी जागेवरच मृत झालेले होते तर जखमी दीपक यांना गोदावरी रुग्णालयात हलवीले.अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आले. सहायक पोलीस नीरीक्षक संदीप हजारे व हवालदार शीवदास चौधरी यांनी पंचनामा केला.

आई, वडीलांचा मृतदेह पाहून मुलीने फोडला हंबरडा
अपघाताची माहीती मीळाल्यानंतर मुलगी नेहा हीने रुग्णालयात धाव घेतली. आई, वडीलांचा मृतदेह पाहून तीने हंबरडा फोडला. तीच्या या आक्रोशाने उपस्थीतांचेही डोळे पानावले होते. श्यामलाल यांच्या पश्यात २मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुलीच्या लग्नासाठी पैश्यांची जमवाजमव करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून पती-पत्नी मिळेल ते काम करत होते. मोठी मुलगी यंदा दहावीच्या वर्षाला आहे. मात्र काळाच्या घालाने दाम्पत्याने पाहिलेले स्वप्न पुर्णपणे भंगले. श्यामलाल हे बेकरीत एक उत्कृष्ठ बेकरीचे कारागीर होते.

Web Title: Wife killed in road mishap with two siblings in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.