While distributing money, one was caught red-handed, beaten by the mob | पैसे वाटप करताना एकाला रंगेहात पकडले, जमावाकडून मारहाण

पैसे वाटप करताना एकाला रंगेहात पकडले, जमावाकडून मारहाण

ठळक मुद्देनेरी बुद्रुक : ग्रामपंचायत निवडणूक उत्सुकता शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्क

नेरी, ता. जामनेर : येथील मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवून आमच्या उमेदवारांना मतदान करा, असे सांगत पैसे वाटप करताना एका कार्यकर्त्याला गुरुवारी सकाळी रंगेहात काही ग्रामस्थांनी पकडले. याठिकाणी त्या कार्यकर्त्याला मारहाण करून पोलीस चौकीत जमा करण्यात आले. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी एकच गर्दी करत प्रचंड संताप व्यक्त केला.

येथील ग्रामपंचायत निवडणूक ही संपूर्ण तालुक्यातून लक्षवेधी ठरत असून अतिशय चुरशीच्या लढती याठिकाणी होतात. याचा प्रत्यय गुरुवारी सकाळी पहावयास मिळाला.येथील ग्रामपंचायत निवडणूक ही संपूर्ण तालुक्यातून लक्षवेधी ठरत असून अतिशय चुरशीच्या लढती याठिकाणी होतात. याचा प्रत्यय पहावयास मिळाला.

बुधवारी १३ रोजी मध्यरात्री चार ते पाच अनोळखी इसम गावातील एका वाॅर्डात घरोघरी जाऊन पैसे वाटप करत होते, हे दृष्य पाहून विरोधी असलेले राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यानी त्यांना हटकले. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा हेच लोक महिलांना पैसे दाखवून इशारे करत होते, असे प्रत्यक्षदर्शीनी यावेळी पोलिसांना सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जामनेर येथील कार्यकर्ते गावात येवून पैसे वाटप करतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? असा नाराजीचा सूर काही कट्टर समर्थकांनी काढला.

Web Title: While distributing money, one was caught red-handed, beaten by the mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.