‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्याला देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:49 PM2020-02-17T12:49:37+5:302020-02-17T12:49:43+5:30

जळगाव : नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात करण्यात आलेला करार रद्द करून या खोºयातील पाणी मोठ्या तुटीच्या गिरणा ...

 The water from 'Naar-Par' should be provided to the Mill Valley | ‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्याला देण्यात यावे

‘नार-पार’चे पाणी गिरणा खोऱ्याला देण्यात यावे

Next

जळगाव : नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात करण्यात आलेला करार रद्द करून या खोºयातील पाणी मोठ्या तुटीच्या गिरणा खोºयाला देऊन खान्देशची तहान भागवावी, अशी मागणी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अ‍ॅड. विश्वासराव भोसले यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. नार-पार गिरणा नदीजोड योजना प्रकल्प राबविल्यास उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होण्यासही मदत होईल, असेही त्यांनी सुचविले आहे.
नार-पार खोºयातील पाणी गिरणा खोºयात वळविण्यासंदर्भात शरद पवार यांनी ११ जानेवारी रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली होती. ही बाब उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, जनतेसाठी सुखावणारी आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दोन दिवसीय जळगाव दौºयादरम्यान अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नार-पार पश्चिम वाहिनी नदीतील पाणी पूर्व वाहिनी गिरणा खोºयात वळविल्यास उत्तर महाराष्ट्रातील जनतेची ४० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होईल.

गिरणा लिंक प्रस्तावाची अंमलबजावणी करावी
नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नार-पार खोºयातील पाणी गुजरात राज्याला देण्यासंदर्भात १५ जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पार-तापी-नर्मदा लिंक प्रस्तावास मान्यता देण्यात येऊन नार-पार खोºयातील ३२ टीएमसी पाणी गुजरातला साबरमतीमार्गे देण्याचा प्रस्ताव तयार झाला व करार होऊन तत्कालीन महाराष्ट्र शासनाने संमती दिली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर मोठा अन्याय झाला असल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी हे पाणी गुजरातला न देता गिरणा खोºयाला देण्यात यावे व राष्ट्रीय जलसंपत्ती नियमन प्राधीकरण, हैद्राबाद या संस्थेने ११ जानेवारी २०११ रोजी तयार केलेल्या नार-पार गिरणा लिंक प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचना करावी, अशीही मागणी अ‍ॅड. भोसले यांनी केली आहे.

Web Title:  The water from 'Naar-Par' should be provided to the Mill Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.