वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण, पांडुरंग आहे सर्वत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:57 AM2020-07-02T00:57:23+5:302020-07-02T00:57:49+5:30

आज आषाढी. एकादशी भारत देशात अनेक संस्कृती, परंपरा, सण, उत्सव, व्रत-वैकल्य यात आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्याची शुद्ध पक्षातील ...

For Warakaris, the festival of Diwali, Pandurang is everywhere | वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण, पांडुरंग आहे सर्वत्र

वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण, पांडुरंग आहे सर्वत्र

googlenewsNext

आज आषाढी. एकादशी भारत देशात अनेक संस्कृती, परंपरा, सण, उत्सव, व्रत-वैकल्य यात आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्याची शुद्ध पक्षातील एकादशी. या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. महाराष्टÑात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय आगळे-वेगळे आहे. या दिवशी वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण असतो. मायबाप, पांडुरंग श्री विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी भुवैकुं ठ पंढरपुरात दाखल होतात. महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून, विविध भागातून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी पंढरीत दाखल होतात.
पण यंदा कोरोनामुळे वारकºयांच्या वारीला खंड पडलाय. अस्सल वारकºयाला वारी चुकल्याचं शल्य, दु:ख आहे आणि हे दु:ख ते फक्त पांडुरंगालाच सांगतील. अशा विरहाच वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे आणि या परिस्थितीला ते लागू आहे.
ज्याचिये आवडी संसार त्यजिला । तेणें कां अबोला धरिला गें मायें।
या विरहणीतुन संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात- ‘‘हे पांडुरंगा! तुमच्या आवडी-प्रेमासाठी सर्व संसार सोडला, घरदार सोडलं तरी तुम्हीच आमच्याशी अबोला का धरला?’’
या माऊलींच्या अभंगाप्रमाणे अस्सल वारकरी श्री पांडुरंगाला विचारतात, ‘‘हे मायबाप पांडुरंगा! आम्ही मुलं-बाळं, संसार सोडून तुमच्या वारीला येतो, दर्शनाला येतो, तुम्हाला भेटण्यासाठी येतो,
आमचं काय चुकलं चुकलं की, तुम्ही आमच्याशी अबोला धरलास! व आमची वारी चुकविलीसी ! कारण काहीही असो, करता-करविते तुम्हीच आहात, तुमच्या इच्छेने सर्व होतं. तुम्हीच गीतेच्या ९ व्या अध्यायात सांगितले आहे ना!
मीचि गां पांडवां । या त्रिभुवनासि वोलावा । सृष्टीक्षयप्रभावा । मुळ तें मी ।। ज्ञानेश्वरी अ.९।।
सर्व सृष्टी तुमच्या सत्तेने चालते, त्रिभुवनाचे चालक-मालक तुम्ही आहात, सर्व कार्य-कारणांचे मूळ तुम्ही आहात. असे असतांना ही वेळ आम्हा वारकºयांवर कां आली? वारी तुम्हीच सुरू केली, तुम्हीच संत नामदेव महाराजांना सांगितलं आहे.
आषाढी कार्तिकी विसरु नका मज, सांगतसे गुज पांडुरंग ।
अशा प्रकारचं प्रेमाचं भांडण वारकरी, पांडुरंगाशी करतो. पांडुरंगाची भेट न झाल्याने, अशी विरह अवस्था सद्य परिस्थिती वारकºयांची आहे. वारकरी सांप्रदायाचं तत्वज्ञानही विशाल आहे, वारकºयांसाठी पांडुरंग सर्वत्र आहे.
-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव

Web Title: For Warakaris, the festival of Diwali, Pandurang is everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव