पंतप्रधानांच्या आवाहनास गावागावांमध्ये प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:12 PM2020-04-05T22:12:51+5:302020-04-05T22:13:03+5:30

घरांसमोर पेटल्या पणत्या

Villagers respond to PM's call | पंतप्रधानांच्या आवाहनास गावागावांमध्ये प्रतिसाद

पंतप्रधानांच्या आवाहनास गावागावांमध्ये प्रतिसाद

Next




भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ५ रोजी रात्री ९ वाजात बाल्कनीमध्ये व घरासमोर दिवे लावण्याचे आवाहन केल्यानुसार यावेळेला दिवे लावत ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करुन त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर विभागात शहरांसह ग्रामीण भागातही यासाठी उत्साह दिसून आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे उत्साही महिलांनी दुपारपासूनच दिवे लावणे व अंगण सजावटीसाठी रांगोळी काढून पूर्व तयारी केली होती. पोलीस पाटील स्नेहल प्रदीप काळे यांनी विविध प्रकारची रांगोळी काढून कोरोना विरोधात संदेश देण्याचे काम केले.

Web Title: Villagers respond to PM's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.