व्हॅलेटाईन डे विशेष : एका मदतीने दोघांमध्ये फुलले प्रेमाचे ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:12 PM2020-02-14T12:12:30+5:302020-02-14T12:12:59+5:30

रामाच्या आगमनामुळे मावळला कुटुंबीयांचा विरोध

Valentine's Day Special: Flowers of Love 'Sprout' in Two With One Help | व्हॅलेटाईन डे विशेष : एका मदतीने दोघांमध्ये फुलले प्रेमाचे ‘अंकुर’

व्हॅलेटाईन डे विशेष : एका मदतीने दोघांमध्ये फुलले प्रेमाचे ‘अंकुर’

Next

जळगाव : माणुसकीच्या नात्यातून प्रत्येकजण कळत न कळत कुणाला तरी मदत करतचं असतो. अशीचं एक मदत, शैलेंद्र सपकाळे यांच्या जीवनाला निलम यांच्या रुपाने कायमची साथं देणारी ठरली. आरटीओ कार्यालायत परवाना काढण्यासाठी निलम यांना केलेल्या मदतीमुळे, त्या ठिकाणी एकमेकांची मने जुळली आणि प्रेमांचे ‘अंकुर’ फुलले. त्यानंतर दोघांनी लग्न करुन, प्रेमाला एक नवी ओळख दिली आहे.
कांचन नगर येथील शैलेंद्र सपकाळे हे गेल्या वर्षी एका कामासाठी जळगावातील आरटीओच्या कार्यालयात गेले होते. परवाना काढण्यासाठी एका खिडकी समोर पुरुषांची मोठी रांग लागली होती. यावेळी नयना या रांगेच्या सर्वांत शेवटी उभ्या होत्या. लवकर नंबर लागण्यासाठी रांगेतील पुरुषांकडून होणाऱ्या गोंधळाचा निलम यांना त्रास होत होता, तर आपला नंबर केव्हा लागेल, याची निलम या आतुरतेने वाट पाहत होत्या. यावेळी शैलेंद्र सपकाळे हे त्या ठिकाणाहुन जात असतांना, रांगेतील पुरुषांचा गोंधळ पाहिल्यानंतर, शैलेंद्र यांना या तरुणीला या गोंधळाचा त्रास होत असल्याचे जाणवले. यावेळी शैलेंद्र यांनी स्वत: मदत करुन, निलम यांचे तात्काळ लायसन्सचे काम करुन दिले. आम्ही आमच्या निर्णयावर ठामं आहोत.. शैलेद्र हे कष्टाळू असून, मला सुखी ठेवतील, याचा मला विश्वास आहे. अशा प्रकारे कुटुंबियांची समजूत घालून निलम व शैलेंद्र यांनी नशिराबाद येथील लक्ष्मी मंदिरात विवाह केला. निलम प्रमाणेच शैलेंद्र यांनादेखील कुटुंबियांचा विरोध झाला. मात्र, नंतर पुत्र रामाच्या आगमानामुळे विरोधही मावळला.
मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात
या मदतीने निलम व शैलेंद्र यांच्यात चांगली ओळख झाली. यावेळी निलम यांनी शैलेंद्र यांना आरटीओचे कुठलेही काम असल्यास मदतीचे आश्वासन दिले. यातून पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन, मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मनं जुळली, मग जातीचा विचार का..?
शैलेंद्र व निलम यांचे बहरलेले थेट लग्नापर्यंत येऊन ठेपले. मात्र, निलम यांच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला. मात्र, निलम यांनी प्रेम हे एक पवित्र नातं आहे. या मध्ये गरिब वा श्रीमंती न पाहता,आमच्या दोघांची मने जुळली आहेत, आम्ही जातीचा विचार केलेला नाही..

Web Title: Valentine's Day Special: Flowers of Love 'Sprout' in Two With One Help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव