यावल तालुक्यातील करंजी येथे दोघा तरुणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 07:32 PM2019-07-14T19:32:22+5:302019-07-14T19:33:15+5:30

बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली.

Two youths were killed in Karanji in Yaval taluka | यावल तालुक्यातील करंजी येथे दोघा तरुणांना मारहाण

यावल तालुक्यातील करंजी येथे दोघा तरुणांना मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देझाडाची फांदी तोडल्याचा आला रागकरंजी येथील घटना चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी करंजी, ता.यावल येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सूत्रांनुसार, तालुक्यातील करंजी येथे सुगंधाबाई सोपान पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला जवळच असलेल्या निंबाच्या झाडाची फांदी अडथळा ठरत होती. ती फांदी सुगंधाबाईचा मुलगा विजय पाटील व पुतण्या तेजराव पाटील यांनी तोडली.
झाडाची फांदी तोडल्यामुळे जवळच असलेल्या सचिन सीताराम पाटील, सीताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सीताराम पाटील (रा.करंजी) व व नवीन रामचंद्र पाटील (रा.वडगाव, ता.रावेर) अशा चौघांनी विजय व तेजराव यांना लोखंडी आसारीने डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झालेल्या अवस्थेत जखमी विजय पाटील यांनी आपली आई सुगंधाबाई व जखमी चुलत भाऊ तेजराव यांच्यासह फैजपूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना मेमो देऊन वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.
याप्रकरणी सचिन सीताराम पाटील, सीताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सीताराम पाटील व नवीन रामचंद्र पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस फौजदार सांगळे करीत आहे.

Web Title: Two youths were killed in Karanji in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.